Mary Millben : अभिजीत दिपके आणि त्यांची ‘कॉकरोच जनता पार्टी’ अमेरिकन व्यक्तींकडून निधी मिळवत आहेत असा आरोप प्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना अभिजीत दिपके यांनी मेरी मिलबेनवर जोरदार टीका केली असून दुसऱ्या देशातील व्यक्ती भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप का करत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. तर आता यावर मेरी मिलबेनने देखील प्रत्युत्तर दिले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसा आणि एक सकारात्मक आवाज बना,” असे आवाहन मिलबेन केले. “अभिजीत (Abhijeet Dipke), सत्य सर्वांना मुक्त करते तुम्हालाही. वास्तव हे आहे की, ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होणार नाही, त्याच क्षणी हे अमेरिकन देणगीदार तुम्हाला सोडून देतील. तुम्ही यशस्वी होणार नाही, कारण बेकायदेशीर प्रयत्न कधीही यशस्वी होत नाहीत. त्याऐवजी, तुमचे अमेरिकन शिक्षण आणि कौशल्य काहीतरी विधायक कामासाठी वापरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसा आणि भारताच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक आवाज बना. योग्य गोष्ट करण्याचे धैर्य तुमच्यात खरोखर आहे का, हे तुमच्या पुढील पावलांवरून दिसून येईल. पंतप्रधान मोदींना (PM Modi) अमेरिकन (America) पाठिंब्याची गरज नाही त्यांना दीड अब्ज बुद्धिमान भारतीय नागरिकांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा गेल्या 25 वर्षांपासून, ज्यामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांची सलग तीन कार्यकाळांतील 12 वर्षे समाविष्ट आहेत, तोपर्यंत कायम राहिला आहे आणि 2029 मध्येही लोक त्यांनाच पाठिंबा देतील हेच सत्य आहे असं मेरी मिलबेन म्हणाली.
तर दुसरीकडे मेरी मिलबेनवर टीका करत दिपके म्हणाले की, पंतप्रधान मोदी आपल्याच देशबांधवांना बदनाम करण्यासाठी अमेरिकन लोकांकडून पाठिंबा का घेत आहेत? भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार परदेशी नागरिकांना कोणी दिला? आम्ही आमच्या समस्या हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. आम्हाला आमच्या देशाच्या कारभारात बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपाची गरज नाही.
Oh dear @abhijeet_dipke, the truth sets everybody free. Even you. And here’s the truth: these US donors will drop you like a hot cake when you don’t succeed. And you won’t, because lawlessness never wins. Instead, take your U.S. education, talent, and use it for good. Sit down with the PM @narendramodi and be a positive voice to advance India. The truth of your courage to do what’s right lies in your next steps.
And the PM doesn’t need American support. He has 1.5 billion beautiful Indian citizens who support him and have for 25 years, 12 years as PM, three consecutive terms. And will again in 2029. That’s the truth.
— Mary Millben (@MaryMillben) October 14, 2026
नेमकं आरोप काय?
मेरी मिलबेन एका पोस्टमध्ये परकीय निधीबाबत आरोप केला आहे. तिने लिहिले आहे, “भारतातील सर्व तरुण देशभक्तांनो हे शांत बसण्याचे वेळी नाही. अभिजीत दिपके आणि ‘सीजेपी’ (CJP) यांना अशा अमेरिकन देणगीदारांकडून निधी मिळत आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत आणि पर्यायाने, त्यांच्या नेतृत्वाखालील तुमच्या भविष्याच्याही विरोधात आहेत. घाबरू नका, माझ्या तरुण देशभक्तांनो! तुमचे पंतप्रधान ज्यांनी 25 वर्षे भारताची सेवा केली आहे (ज्यात 12 वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ समाविष्ट आहे) आणि जे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. ते माझ्या देशातील विघातक शक्तींसमोर झुकणार नाहीत. हे काही निवडक देणगीदार एका जागतिक धोरणाचा अवलंब करतात.
ते जगातील पुराणमतवादी (conservative) नेत्यांना लक्ष्य करतात, त्या देशांतील अशा व्यक्तींना शोधून काढतात ज्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे, त्यांना कट्टरपंथी बनवतात, पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवतात आणि तिथे गोंधळ व विध्वंस घडवून आणण्यासाठी त्यांना निधी पुरवतात. जरी त्यांना कधीही पूर्ण यश मिळाले नसले, तरी त्यांनी राष्ट्रीय विकास आणि प्रशासनाच्या कामात अडथळे नक्कीच निर्माण केले आहेत.
