Download App

तुम्ही ज्या महिलेच्या घरी जेवले, तिला मोदींना गॅस, वीज दिली; शाहांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

Amit Shah Motion of no confidence : या सभागृहात एक नेते आहेत त्यांचं 13 वेळी लॉंन्चिंग केलं गेलं. पण ते फेल झाले. एका लॉन्चसाठी तर ते विदर्भातील जलका गावातील रहिवासी असणाऱ्या एका कलावती नावाच्या महिलेच्या घरी गेले. जेवून आले. त्यानंतर 6 वर्ष त्यांचं सरकार होतं पण त्यांनी तिच्यासाठी काय केल? तिला गॅस, वीज ही मोदींनी दिलं. तिला मोदींवर अविश्वास नाही. असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर नाव न घेता टीका केली. (Amit Shah criticize Rahul Gandhi in Parliament session Motion of no confidence PM Modi )

काँग्रेसने भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण केलं, मोदींनी झटक्यात नेस्तनाबूत केलं

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (motion of no confidence) लोकसभेत (Lok Sabha) चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत भाग घेतला. लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल यांनी आज पहिल्याच भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. त्याला भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला.

World Cup 2023 Scheduled : भारत-पाकसह 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या; पहा नवे शेड्युल

काय म्हणाले अमित शाह?

अमित शाह म्हणाले की, तुम्ही अविश्वास ठराव आणला त्याला काही मुद्दा हवा. जे लोक बोलले त्यांच्याकडे एकही मुद्दा नाही. हा ठराव भ्रमित करण्यासाठी आहे. मी जनतेत फिरतो मात्र कुठेच अविश्वास जाणवत नाही. तर मोदींवर सर्वात जास्त विश्वास आहे. त्यामुळे भाजपला दोनदा निवडून दिलं. स्वातंत्र्यानंतर मोदी सर्वात लोक प्रिय मुख्यमंत्री ठरले. कॉंग्रेसच्या 35 वर्षांतील काही निर्णय लोकांना आठवतात पण भाजपचे 9 वर्षांतील 50 निर्णय लोकांना सहज आठवतात.

तसेच ते पुढे म्हणाले, या सभागृहात एक नेते आहेत त्यांचं 13 वेळी लॉंन्चिंग केलं गेलं. पण ते फेल झाले. एका लॉन्चसाठी तर ते बुंदेलखंडमध्ये एका कलावती नावाच्या महिलेच्या घरी गेले. जेवून आले. त्यानंतर 6 वर्ष त्यांचं सरकार होतं पण त्यांनी तिच्यासाठी काय केल? तिला गॅस, वीज ही मोदींनी दिलं. तिला मोदींवर अविश्वास नाही. असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर नाव न घेता टीका केली.

Tags

follow us