Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने हादरले मेघालय, 3.2 रिश्टर स्केलची नोंद

नवी दिल्ली : सध्या जगात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटना घडत आहे. यातच भारतातही एका ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी मणिपूरजवळील बिष्णुपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या बिष्णुपूरपासून 11 किमी पश्चिम-वायव्यला होता. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:46 वाजता भूकंप पृष्ठभागापासून 25 […]

Untitled Design (63)

Untitled Design (63)

नवी दिल्ली : सध्या जगात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटना घडत आहे. यातच भारतातही एका ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी मणिपूरजवळील बिष्णुपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या बिष्णुपूरपासून 11 किमी पश्चिम-वायव्यला होता. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:46 वाजता भूकंप पृष्ठभागापासून 25 किलोमीटर खोलीवर झाला.

मणिपूरनंतर (Manipur) आता मेघालय भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. मेघालयमध्ये (Meghalaya) 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मेघालयत मंगळवारी (28 फेब्रुवारी) सकाळी 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. तर मणिपूरमध्ये पहाटे 2:46 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

दरम्यान यापूर्वी 19 फेब्रुवारीला आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा शहरात भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, इंदूरच्या नैऋत्येला सुमारे 151 किमी अंतरावर असलेल्या धारमध्ये दुपारी 1 वाजता भूकंप झाला. भूकंप एजन्सीने सांगितले की, भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर होते. तर 6 फेब्रुवारीच्या सुरुवातीला तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानंतर 50 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले

भूकंपाची तीव्रता
रिश्टर स्केलवर 2.0 पेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप सूक्ष्म म्हणून वर्गीकृत केले जातात. रिश्टर स्केलवर सूक्ष्म श्रेणीचे 8,000 भूकंप जगभरात दररोज नोंदवले जातात. त्याचप्रमाणे 2.0 ते 2.9 तीव्रतेचे भूकंप किरकोळ श्रेणीत ठेवले जातात. असे 1,000 भूकंप दररोज होतात. अतिशय हलक्या श्रेणीतील भूकंप 3.0 ते 3.9 तीव्रतेचे असतात, जे एका वर्षात 49,000 वेळा नोंदवले जातात.

Exit mobile version