हैदराबाद : तेलंगणा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात काँग्रेसने तेलंगणामध्ये प्रचाराचा जोर वाढवला आहे. आज (17 सप्टेंबर) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या 5 गॅरेंटी योजना धर्तीवर तेलंगणासाच्या जनतेसाठी 6 गॅरेंटी योजना जाहीर केली.
माझ्या सहकाऱ्यांसह या महान तेलंगणा राज्याच्या जन्माचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली, आता ते नव्या उंचीवर नेणे हे आपले कर्तव्य आहे. तेलंगणात काँग्रेसचे सरकार पाहणे हे माझे स्वप्न आहे, जे समाजातील सर्व घटकांसाठी काम करेल, असं भावनिक आवाहनही सोनिया गांधी यांनी यावेळी केलं. (Announced 6 Guarantee Scheme for the people of Telangana by Congress leader soniya Gandhi)
1. महालक्ष्मी गॅरेंटी :
– महिलांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत
– एलपीजी गॅस सिलिंडर 500 रुपयांना
– आरटीसी बसमध्ये मोफत प्रवास
2. रायथू भरोसा गॅरेंटी :
– शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपयांची आर्थिक मदत
– शेतमजुरांना 12 हजार रुपयांची मदत
– धान पिकावर ५०० रुपये बोनस
3. ग्रह ज्योतीची गॅरेंटी :
– सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज
4. इंदिराम्मा इंदू गॅरेंटी :
– ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांना घर आणि 5 लाख रुपये दिले जातील
– तेलंगणा चळवळीतील कार्यकर्त्यांना 250 स्क्वेअर यार्डचे भूखंड मिळणार
5. युवा विकास गॅरेंटी :
– विद्यार्थ्यांना 5 लाख रुपये किमतीचे विद्या भरोसा कार्ड दिले जाणार
– प्रत्येक विभागात एक तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल
6. चेयुथा :
– 4,000 रुपये मासिक पेन्शन
– राजीव आरोग्यश्री 10 लाख रुपयांचा विमा