भारत सरकारचा दहशतवादावर आणखी एक प्रहार, हाफिज सईदसह 23 जणांना केले दहशतवादी घोषित

पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 23 जणांना दहशतवादी घोषित केले आहे.

Untitled Design 84

Untitled Design 84

Another blow against terrorism : केंद्र सरकारने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 23 जणांना दहशतवादी घोषित केले आहे. या यादीत जैश ए मोहम्मदचा सदस्य मोहम्मद मुसद्दीक उर्फ डॉक्टर तसेच लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा जावई हाफिज खालिद वलिद यांचा देखील समावेश आहे.

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, या व्यक्ती घुसखोरी घडवून आणणे, दहशतवादी भरती करणे, निधी उभारणे, शस्रास्रांचा पुरवठा करणे, ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवणे आणि दहशतवादी कारवायांचे नियोजन करणे अशा विविध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या 23 जणांपैकी 17 जण पाकिस्तानी नागरिक असून सहा जण भारतीय आहेत. मात्र, हे सर्वजण सध्या पाकिस्तान किंवा पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असून तेथून भारतविरोधी कारवाया चालवत असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

पुण्यात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; मथुरा प्युअर व्हेज बंद, 7 रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

गृहमंत्री अमित शाह यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरोधातील शून्य-सहनशीलता धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांमध्ये मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसद्दीक ऊर्फ डॉक्टर, मुफ्ती मोहम्मद असगर खान, हाफिज अब्दुल शकूर, हाफिज सईद अब्दुल्ला जिहादी, फिरदौस अहमद भट, गुलाम फरीद, हारुण रशीद गनई, बिलाल अहमद मीर, अबिद कय्यूम लोन, नझीर अहमद गुज्जर, अब्दुल रऊफ, अशफाक अहमद, हाफिज खालिद वलीद, मौलाना इमदाद उल्ला मक्की, मौलाना सैफुल्ला खालिद, मोहम्मद याकूब, मौलाना युसूफ तैयबी, ओवैस फारूज, कारी याकूब शेख, राणा इफ्तिखार, वसीम नूर जाट आणि मोहम्मद शहीद फैजल यांचा समावेश आहे.

राज्यात मुसळधार पाऊस; 4 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

या कारवाईमुळे संबंधित व्यक्तींच्या मालमत्ता जप्त करणे, त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणणे, शस्त्रास्त्र पुरवठ्याचे मार्ग रोखणे आणि त्यांच्या दहशतवादी जाळ्यावर कारवाई करणे राष्ट्रीय तपास यंत्रणांसाठी अधिक सोपे होणार आहे. यूएपीएच्या चौथ्या अनुसूचीत समाविष्ट करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची एकूण संख्या आता 80 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद मुसद्दीक ऊर्फ ‘डॉक्टर’ याच्यावर अयोध्येतील रामजन्मभूमी परिसर, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच पानिपत येथील आयओसीएल रिफायनरीची टेहळणी केल्याचा आरोप आहे. तसेच ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची तस्करी आणि घुसखोरी घडवून आणण्यात तो सक्रिय असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.

Exit mobile version