Siddaramaiah Cabinet Meeting Decision : कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. कर्नाटकातील भाजपचा हा पराभव भाजपसाठी आगामी लोकसभेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर भाजपवर पहिला वार केला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) अनेक मोठे निर्णय घेतले. यात भाजप सरकारच्या काळात आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर, के.बी.हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा कर्नाटकातील शाळांच्या अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली. हे देन्ही निर्णय एकप्रकारे भाजपासाठी काँग्रेसकडून करण्यात आलेले वारच आहेत. (Religious Conversion Prevention Law Aabolished By Siddaramaiah Government)
MNS Vs NCP : राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री
कर्नाटकचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले की, कर्नाटक मंत्रिमंडळाने शालेय पाठ्यपुस्तकांतील RSS संस्थापक केबी हेडगेवार आणि इतरांशी संबंधित प्रकरणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मागील सरकारने जे काही बदल केले होते, ते आम्ही बदलले आहेत. तर, नेहरूंनी सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे आणि बीआर आंबेडकर यांच्यावरील कवितांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल असे बंगारप्पा यांनी सांगितले.
धर्मांतरविरोधी कायदा रद्द
मागील भाजप सरकारने धर्मांतर विरोधी कायदा आणला होता हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे कायदा व संसदीय कार्य मंत्री एच.के.पाटील यांनी सांगितले. याशिवाय राज्य मंत्रिमंडळाने शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रार्थनेसह संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने जुना कायदा परत आणण्यासाठी राज्यातील एपीएमसी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
MNS Vs NCP : राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री
भाजपकडून जोरदार हल्लाबोल
दरम्यान, सिद्धारमय्या सरकाकडून आज कर्नाटकात घेण्यात आलेल्या धर्मांतर कायदा रद्द कऱण्याच्या निर्णयावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. काँग्रेसला मुस्लिमांची मते हवी असून, सिद्धरामय्या यांचे सरकार हिंदूंच्या विरोधात असल्याचे कर्नाटकचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते बीसी नागेश यांनी म्हटले आहे.