Anurag Thakur : पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात, भाजपकडून राहुल गांधीवर खरमरीत टीका

“पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात आहे.” असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या आरोपावर ठाकूर यांनी उत्तर दिले, त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी काल केंब्रिज विद्यापीठाच्या कार्यक्रमास बोलताना केंद्र सरकार भारतीय मीडिया आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण करत असल्याचा आरोप […]

anurag thakur

anurag thakur

“पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात आहे.” असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या आरोपावर ठाकूर यांनी उत्तर दिले, त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी काल केंब्रिज विद्यापीठाच्या कार्यक्रमास बोलताना केंद्र सरकार भारतीय मीडिया आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण करत असल्याचा आरोप केला होता, सोबतच माझ्या फोनमध्येही पेगॅसस वापरून हेरगिरी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “राहुल गांधी आणि काँग्रेस नेते परदेशी भूमीवर भारताची बदनामी करत आहेत. पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात आहे. ईशान्येकडील निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसून आले आहे की कॉंग्रेसला लोकांनी पुन्हा एकदा नाकारले आहे, कॉंग्रेस लोकांचा जनादेश स्वीकारण्यास तयार नाही. कालच्या निकालावरून स्पष्ठ होते की लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे.”

हेही वाचा : Rahul Gandhi At Cambridge : पेगॅससद्वारे माझ्या फोनची हेरगिरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप

दरम्यान भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्या चांगलंच चर्चेत आलं आहे.
राहुल गांधी यांनी या युनिवर्सिटीमध्ये केलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की, ‘भारतामध्ये लोकशाहीची स्थिती चिंताजनक आहे.’त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला की, ‘त्यांच्या फोनची पेगॅससच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आली. याची माहिती त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या या गंभीर आरोपानंतर आता पुन्हा एकदा पेगाससचा मुद्दा चर्चेला आला आहे
Exit mobile version