Download App

Air India Express : आजारपणाचा ड्रामा करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना नारळ; इतरांना अल्टिमेटम

विमान कंपनीचे क्रू मेंबर्स अचानक सुट्टीवर गेल्याने कंपनीला आतापर्यंत जवळपास 194 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

नवी दिल्ली : आजारी असल्याचे कारण देत सामूहिक सुट्टीवर गेलेल्या 25 क्रू कर्मचाऱ्यांना एअरइंडिया एक्स्प्रेसने नारळ देत कामावरून काढून टाकले आहे. तर, सुट्टीवर असलेल्या अन्य क्रू मेंबर्सना दुपारी 4 वाजेपर्यंत कामावर रूजू होण्याचं अल्टिमेटम दिले आहे. विमान कंपनीचे क्रू मेंबर्स अचानक सुट्टीवर गेल्याने कंपनीला आतापर्यंत जवळपास 194 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. उड्डाणं रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. य सर्व घडामोडींमध्ये आता कंपनीने सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Around 25 Cabin Crew Members Of Air India Express Airlines Terminated)

कोरोनात टक्केवारी खाणाऱ्या मराठी माणसाचं समर्थन करणार का? रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ संतापल्या..

एनआय वृत्तसंस्थेने केलेल्या ट्वीटनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सुमारे 25 कर्मचाऱ्यांना (केबिन क्रू मेंबर्स) कामावर न आल्याने बडतर्फ करण्यात आल्याचे म्हटले आहे. याशिवाय एअरलाइनने संप करणाऱ्या केबिन क्रूला आज (दि.9) दुपारी 4 वाजेपर्यंत कामावर परतण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.

सरकारने मागवला अहवाल

कर्मचाऱ्यांच्या अचानक सुट्टीवर जाण्याने एअरइंडिया एक्सप्रेसवर अनेक उड्डाणं रद्द करण्याची नामुष्की ओढावली असून, लाखो प्रवाशांना नागक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्वांमध्ये आता मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करणे आणि प्रवाशांना होणारा त्रास पाहता नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. तसेच एअरलाइन्सला कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यास सांगितले आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंचा हुकमी एक्का मैदानाबाहेर; नाशकातील ‘फायरब्रँड’ नेता तडीपार

कर्मचारी का गेले सामूहिक रजेवार

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसचे केबिन क्रू मेंबर्स दीर्घकाळापासून कंपनीवर गैरव्यवस्थापनाचा आरोप करत आहेत. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. याच कारणामुळे  बुधवारी (दि. 8 मे) 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी असल्याचे कारण देत सामूहिक रजा घेतली. याचा फटका विमानांच्या उड्डाणांवर झाला आहे.

follow us

वेब स्टोरीज