पाच राज्यांच्या विधानसभेचे बिगुल वाजले; बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान, राहुरी, बारामतीची पोटनिवडणूकही जाहीर

assembly elections-पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभेची निवडणूक जाहीर झालीय.

5 State Election

5 State Election

assembly elections of 5 states west bengal, Assam, Tamilnadu, Kerala, announced : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभेची निवडणूक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलीय. आसाम, केरळ आणि पुड्डचेरी राज्यात एकाच टप्प्यात 9 एप्रिलला मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. येथे 23 आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व ठिकाणची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या तारखा जाहीर केल्या आहेत.

आठ ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील राहुरी व बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.


पाच राज्यांत असे मतदान होणार

राज्य जागा मतदान
पश्चिम बंगाल 294 23 आणि 29 एप्रिल

तामिळनाडू 234 23 एप्रिल

आसाम 126 9 एप्रिल

केरळ 140 9 एप्रिल

पुद्दुचेरी 30 9 एप्रिल


राहुरी, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख-6 एप्रिल
अर्जाची छाननी-7 एप्रिल
अर्ज माघारी-9 एप्रिल
मतदान-23 एप्रिल
मतमोजणी-4 मे


पाच राज्यात 17 कोटी मतदार
या पाच राज्यात 17 कोटी 4 लाख मतदार असून, विधानसभेच्या 824 जागा आहेत. तर 2 लाख 19 हजार मतदान केंद्र आहेत. तर 25 लाख मतदान अधिकारी असणार आहेत.

राजकीय हिंसाचार खपवून घेणार नाही, नवीन घोषणा करता येणार नाही-मुख्य निवडणूक आयुक्त
निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होतो. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी थेट इशारा दिला आहे. राजकीय हिंसाचार खपवून घेतला जाणार आहे. आचारसंहिता लागू झाली असून, आता निवडणूक असलेल्या राज्य सरकारला कोणत्याही प्रकारच्या नवीन घोषणा करता येणार नाहीत, असे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केलंय.


आचारसंहितेपूर्वी ममता बॅनर्जीची मोठी घोषणा

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केलीय. पुजारी आणि अजान देणाऱ्यांच्या मानधनात पाचशे रुपयांची वाढ केलीय. आता महिन्याला दोन हजार रुपयांची मानधन मिळणार आहे.

Exit mobile version