Download App

एमपी-छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान; भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस

MP Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहेत. आज राज्यातील 230 जागांसाठी मतदान पूर्ण झाले. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. काही ठिकाणी किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या मात्र इतरत्र मतदान शांतते संपन्न झाला. 230 जागांसाठी 2533 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील करण्यात आले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम या तीन राज्यात मतदान पूर्ण झाले आहे. तर राजस्थान 23 नोव्हेंबर आणि तेलंगानामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला पाचही राज्यातील विधानसभेचे निकाल आहेत.

दुसरीकडे छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान संपले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70 जागांसाठी 67.34 टक्के मतदान झाले. गरिआबंदच्या बिंद्रनवगढमध्ये नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर हल्ला केला होता. यादरम्यान आयईडी स्फोटात आयटीबीपीचा एक जवान शहीद झाला आहे. त्याचवेळी बालोदाबाजारमध्ये मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मोठी बातमी! खाजगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण अनिवार्य करणारा कायदा कोर्टाकडून रद्द

छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 20 जागांवर सुमारे 78.07 टक्के मतदान झाले होते. तर 17 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67.34 टक्के मतदान झाले होते. 2018 मध्ये छत्तीसगडमध्ये एकूण 76.60 टक्के मतदान झाले होते. जे या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9.26 टक्के अधिक होते.

Delhi AQI : इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रदूषण आरोग्यास हानिकारक; जाणून घ्या प्रतिबंधक उपाय

2018 मध्ये मध्य प्रदेशात एकूण मतदानाची टक्केवारी 74.97 टक्के होती. त्याचवेळी 2023 मध्येही एकूण मतदानाची टक्केवारी 75 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 71.16 टक्क्यांवर पोहोचली होती. मध्य प्रदेशातील अनेक मतदान केंद्रे दुर्गम भागात आणि गावांमध्ये आहेत. या कारणास्तव, अंतिम आकडेवारी मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो.

Tags

follow us