Download App

Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?

  • Written By: Last Updated:

Atiq was making ‘second home’ in Rajasthan, Maharashtra and Gujarat, wanted to change business too : चार दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अतिकच्या मृत्यूनंतर त्याच्या कारनाम्यांच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत.

अतिक अहमदला योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आपले दिवस संपायला लागतील अशी कुणकुण लागली होती. पण परिस्थिती अशी येईल की आपला व्यवसाय फक्त यूपीमध्ये विलीन करावा लागेल असे नाही तर आपल्या व्यवसायातही बदलही करावे लागतील, याची आतिक अहमदला जराही कल्पना नव्हती. मात्र परिस्थिती सरकार बदलल्याने, परिस्थिती बदलल्याने त्याला उत्तर प्रदेशात खंडणी व अपहरणाच्या धंद्याकडे पाठ फिरवावी लागली. शिवाय तुरुंगात असताना महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये आपले ‘सेकंड होम’ म्हणून मजबूत नेटवर्क तयार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कधी कधी अतिकच्या सांगण्यावरून त्याचे गुंड पाण्यासारखे पैसे खर्च करायचे. मात्र बदललेल्या परिस्थितीत त्यांनी अतिककडेच नव्हे तर त्याच्या मुलांकडेही लक्ष देणे बंद केले होते.

पहिला व्यवसाय सहा वर्षांपूर्वी बदलला
अतिक अहमदच्या मृत्यूनंतर अशी अनेक गुपिते उघड होत आहेत, ज्यावरून उत्तर प्रदेशात त्याची चलती कमी झाल्यानं तो देशाच्या विविध राज्यात आपले जाळे पसरवत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक अहमदने तुरुंगात गेल्यानंतर आपण परत बाहेर येऊ शकणार नाही हे लक्षात येताच त्याने आपली गुन्हेगारीचा धंदा बदलण्याची योजना आखली. उत्तर प्रदेश पोलिसांशी संबंधित एक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी सांगतात की, अतिक अहमद हा खून आणि उत्तर प्रदेशातील इतर व्यावसायिक गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा व्यवसाय करायचा, खंडणी आणि अपहरण तसेच लोकांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करायचा. मात्र योगी सरकार सत्तेत आल्यानंतर अतिकला जेल झाली. तो तुरुंगात गेल्यावर त्याला त्याच्या गुन्हेगारी व्यवसायात नुकसान तर झालेच, शिवाय त्याने आपला गुन्हेगारीचा व्यावसाय उत्तर प्रदेशातून अन्य राज्यांत हलवण्याची योजना आखावी लागली.

सामनातील आग्रलेख ते नागपूर सभेतील अजितदादांचे भाषण, संजय राऊत थेट बोलले

सूत्रांनी सांगितले की, अतिक अहमदने सहा वर्षांपूर्वी आपला पहिला व्यवसाय बदलला. अतिकने अवैध शस्त्रास्त्र व्यापाराचा व्यवसाय सुरू केला होता. सूत्रांचे म्हणणे आहे की, सहा वर्षांपूर्वी अतिक अहमदने पंजाब आणि जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानातून येणारी शस्त्रास्त्रे ठेऊन एक संघटित टोळी म्हणून शस्त्रास्त्र पुरवठ्यात हात घालायला सुरुवात केली. यादरम्यान अतिकने केवळ पाकिस्तान आणि आयएसआयच्या बॉसशी हस्तांदोलन केले नाही, तर काश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि पंजाबच्या टोळ्यांशी मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशातील अतिक अहमदचा व्यवसाय मोडीत काढल्यानंतर तो पुढे जाण्यासाठी असे मार्ग शोधत होता. त्यामुळे त्याने स्वत:ला आणि त्याच्या टोळीला बेकायदेशीरपणे जमीन बळकावणे तसेच शस्त्रास्त्र व्यवहारात सहभागी करून घेतले.

बंदर-निर्यात व्यवसायात यायचे होते
तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, अतिकचा धाक इतका होता की त्याने काळ्य धंदा करण्याचं काम बरचं कमी केलं होतं. मात्र, गुन्हेगारीच्या धंद्यातून पाय काढता घेऊनही त्याचा मुलगा असद आणि पत्नी शाहिस्ता यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. पण योगी सरकारच्या कडकपणामुळे अतिकने स्वत:ला केवळ कमकुवत समजले नाही, तर मुंबई आणि राजस्थानच्या बड्या बिल्डर्स आणि कंपन्यांच्या सहकार्याने आपल्या मुलाला आयात-निर्यातीच्या कामात गुंतवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, तो देशातील काही राज्यांमध्ये मोटार वाहनांचे शोरूम उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याची काही जुनी माणसं मदत तर करत होतीच, पण आपल्या नेटवर्कमधील लोकांच्या धंद्यात अतिकचे पैसे गुंतले होते. 2017 नंतर अतीक अहमदला असे गुन्हे करण्यासाठी मोकळे हात मिळू शकले नाहीत, परंतु त्याची भीती इतकी होती की लोक भीतीपोटी त्याला गुलाबी आणि पांढर्‍या स्लिपद्वारे ठराविक रक्कम पाठवत होते.

अतिक अहमदने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि त्याच्या साथीदारांमार्फत मुंबई आणि पुणे, महाराष्ट्रात सुरक्षित आश्रयस्थान शोधण्यास सुरुवात केली होती. याशिवाय अतिक अहमदने आपल्या कुटुंबीयांसाठी रिअल इस्टेट व्यवसायातही हात आजमावण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शहरांचाही समावेश आहे, जिथे अतिकने अनेक मोठ्या मालमत्ता आणि त्याचे लपण्याचे ठिकाण बनवले होते. तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी खुलासा केला आहे की अतिक अहमदची स्थिती अशी होती की त्याला गुन्हेगारीच्या नियेत राहायचे होते, परंतु तो व्यवसाय स्थलांतरित करून देशाच्या इतर राज्यांमधून चालवण्याच्या पूर्ण तयारीत होता.

Tags

follow us