Download App

Rahul Gandhi : संविधानावर भाजपसह संघाचं आक्रमण, विरोधकांच्या बैठकीतून राहुल गांधी बरसले…

भारतासह संविधानावर भाजप आणि संघाने आक्रमण केल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर बरसले आहेत. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधींनी विरोधकांची आगामी वाटचाल कशी असणार? याबाबतही थेट भाष्य केलं आहे.

Titanic Submarine Missing: टायटन पाणबुडीमध्ये स्फोट घडवून आणणारे कॅटॅस्ट्रॉफिक इम्प्लोशन काय आहे?

पुढे बोलताना गांधी म्हणाले, भारताच्या संविधानावर लोकांच्या आवाजावर भाजपने आक्रमण केलं आहे. सातत्याने भाजपसह संघाकडून आक्रमण होत असून ही विचारधारेची लढाई आहे. त्यासाठीच आम्ही आज एकत्र आल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकणाऱ्या भुजबळांचा यू टर्न; म्हणाले, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची…

तसेच ही लढाई लढत असताना आमच्यात फरक असेल पण आम्ही एकत्र काम करणार आहोत. वेगवेगळ्या विचारधारांची आम्ही रक्षा करणार असल्याचं राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितलं आहे.

श्वेता तिवारीच्या बाथरूममधील PHOTO व्हायरल, या गेटअपमध्ये पाण्यात भिजताना दिसली अभिनेत्री

आजच्या बैठकीनंतर देशभरातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक शिमल्यात पार पडणार असल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केलं आहे. आज झालेली मिटींग ही विरोधकांना एकत्र करण्याची एक प्रक्रिया असून पुढील काळात आम्ही मोठ्या ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.

दरम्यान, देशात पुढील काळात येणाऱ्या निवडणुका विरोधी पक्षनेते एकत्रितपणे लढणार असल्याच्या प्रस्तावावर एकमत झालं असल्याची माहिती राहुल गांधी यांनी यावेळी दिली आहे.

follow us