India-Bangladesh Border Dispute : घुसखोरी करण्याचा प्रयत्न; भारत-बांगलादेश सीमेवर तणाव

India-Bangladesh Border Dispute : भारत आणि बांगलादेश सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

India Bangladesh Border Dispute

India Bangladesh Border Dispute

India-Bangladesh Border Dispute : भारत आणि बांगलादेश सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 24 तासांत भारताने आपल्या नागरिकांना बळजबरीने बांंगलादेशात पाठवण्याचे प्रयत्न केले असल्याचा दावा बांगलादेशाकडून करण्यात आला आहे. 4 हजार किलोमीटरहून अधिक लांबीची आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर ऑफ बांगलादेशने सतर्कता वाढवली असून कोणतीही बेकायदेशीर घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्ट केले आहे.

बॉर्डर ऑफ बांगलादेशने (India-Bangladesh Border Dispute) केलेल्या दाव्यानुसार, झेनाईदाह जिल्ह्यात एका व्हॅनमधून 30-35  लोकांना आणून त्यांना बळजबरीने सीमेपलीकडे पाठवण्याचा भारतीय सुरक्षा दलांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगाल, आसाम राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर घुसखोरांविरुद्ध कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोणत्याही नागरिकाला परत पाठवण्याची प्रक्रिया बळाचा वापर न करता योग्य कायदेशीर आणि राजनैतिक मार्गांनीच झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया बांगलादेशाकडून देण्यात आली आहे.

कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला; शिरूर तालुक्यात खळबळ-

तर आता या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांच्या महासंचालक स्तरावरील बैठक नवी दिल्लीत 8 ते 11 जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत यावर काही मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version