Download App

Gauri Lankesh Murder Case : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

  • Written By: Last Updated:

Gauri Lankesh Murder Case : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक गौरी लंके हत्या प्रकरणातील आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) जामीन मंजूर केला आहे. मोहन नायक (Mohan Nayak) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात जामीन मिळालेला मोहन नायक हा पहिलाच आरोपी आहे. न्यायमूर्ती एस. विश्वजीत शेट्टी यांच्या एकल खंडपीठाने आरोपीला जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. मोहन नायकला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

उद्वव ठाकरे गटाने केली शिंदेंच्या २३ आमदारांची कोंडी! 

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींनी घेतलेल्या बैठकांमध्ये नायक उपस्थित होता, असा आरोप त्याच्यावर आहे. या बैठकांमध्ये लंकेश यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना आश्रय देण्यासाठी नायकने घर भाड्याने दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, या प्रकरणातील सुनावणीत विलंब होत असल्याच्या कारणावरून नायकला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Government Schemes : महाराष्ट्र मुद्रांक शुल्‍क अभय योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी 18 जुलै 2018 पासून तुरुंगात आहे. तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. किंवा धमकी देणार नाही. आरोपी गेल्या पाच वर्षांपासून पोलिस कोठडीत होता. सुनावणीला विशिष्ट कालावधी लागल्याने आणि उशीर झाल्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. या अर्जाच्या आधारे आरोपी मोहनला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दाखल केलेल्या आरोपपत्रात ५२७ साक्षीदारांचा उल्लेख असल्याचेही कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आतापर्यंत यापैकी केवळ 90 साक्षीदारांची चौकशी झाली आहे. 11 फेब्रुवारी 2019 रोजी न्यायालयाने या प्रकरणाचा खटला ट्रायल कोर्टाला जलद गतीने चालवण्याचे निर्देश दिले होतं, असं म्हटलं होतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणात 30 ऑक्टोबर 2021 रोजी आरोप निश्चित करण्यात आले होते. ५२७ साक्षीदारांची साक्ष नोंदवता येणार नाही, असे आमचे मत आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत केवळ 90 साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

लंकेश यांची 2017 मध्ये हत्या
पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. दोन मोटार सायकल स्वारांनी त्यांना बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून ठार केलं होतं. त्यांच्या छातीवर आणि डोक्यावर गोळ्या लागल्या होत्या. हा हल्ला इतका भीषण होता की गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला. गौरी लंकेश ह्या लंकेश पत्रिका या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. गौरी लंकेश यांच्या हत्येचे पडसाद देशभर उमटले. गौरी लंकेश या विवेकवादी विचारवंत होत्या. त्यांच्या हत्येनंतर पत्रकार आणि विचारवंतांनी शांततेच्या मार्गाने रोष व्यक्त केला होता.

Tags

follow us