Download App

Bathinda Military Station : भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार, 4 जवान शहीद

  • Written By: Last Updated:

Firing At Bathinda Military Station : पंजाबच्या भटिंडा येथील आर्मी स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत लष्कराचे चार जवान शहीद झाले असून, गोळीबाराच्या घटनेनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.३५ वाजता भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले. याबाबत लष्कराच्या दक्षिण पश्चिम मांडने एक निवेदन जारी केले आहे. बुधवारी पहाटे भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या. त्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान संशयित व्यक्तीने जवानांवर गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले. हल्लेखोर साध्या वेशात होता अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मिलिटरी स्टेशनवर करण्यात आलेला हा गोळीबार दहशतवादी हल्ला नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. या घटनेत शहीद झालेले जवान 80 मीडियम रेजिमेंटचे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी भटिंडा मिलिटरी स्टेशनमधून मॅगझिनसह एक इन्सास रायफल बेपत्ता झाली होती. त्यानंतर आज गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे रायफल चोरणाऱ्या व्यक्तीनेच हा हल्ला केला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

Chandrakant Patil : नाराजी नाही, राजीनामा घ्या; राऊतांनी शिंदेंना खडसावले

भटिंडाचे एसएसपी गुलनीत खुरुना यांनी सांगितले की, घडलेली ही घटना कोणताही दहशतवादी हल्ला नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. या घटनेत शहीद झालेले जवान 80 मीडियम रेजिमेंटचे असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

Tags

follow us