Download App

Video: मुख्याध्यापिका अन् सहाय्यक शिक्षिकेत फ्री स्टाईल हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

शाळेची मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालाय.

  • Written By: Last Updated:

Video of Beating : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. येथील एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका दोघींनीही एकमेकींनी चांगलाच चोप दिलाय. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. (Beating ) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला आहे.

Pune Rain Update: पुणेकरांनो सावध राहा ! हवामान विभागाचा रेड अलर्ट, खडकवासलातून विसर्ग वाढला !

ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

follow us

संबंधित बातम्या