Download App

धोतर घातलेल्या शेतकऱ्याला हाकलून देणे नडले ! सरकारच्या दणकाने जीटी वर्ल्ड मॉल बंद

GT Mall: धोतर घालून मॉलमध्ये जावू शकत नाही. पॅण्ट घालून येण्यास शेतकऱ्यास सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाला.

  • Written By: Last Updated:

Bengaluru’s GT Mall Sealed After Denying Entry To Farmer In Dhoti: एमबीएचे शिक्षण घेणाऱ्याने मुलाने काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी बापाला पहिल्यांदा बेंगळुरूमध्ये (Bengaluru) मॉल दाखविण्यासाठी नेले होते. दोघेही बेंगळुरूतील जीटी मॉलमध्ये (GT Mall) गेले. शेतकरी फकीरप्पा व मुलगा हे दोघे मॉलमध्ये गेले होते. मुलगा टी शर्ट आणि पॅण्ट घालून होता. वडिल मात्र धोतर घालून होते. त्यांना मॉलमध्ये सुरक्षारक्षकांनी थांबविले. धोतर घालून मॉलमध्ये जावू शकत नाही. पॅण्ट घालून येण्यास शेतकऱ्यास सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभर मॉलविरोधात संतापाची भावना होती. मॉल थेट बंद करण्याची मागणी झाली. त्यानंतर सरकारने हा मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मालमत्ता कर न भरल्याप्रकरणई महानगरपालिकेने मॉलला सील ठोकत दणका दिला.(Bengaluru’s GT Mall Sealed After Denying Entry To Farmer In Dhoti)

DPDC Meeting : बारामतीच्या दूषित पाण्यावर अजित पवार-शरद पवारांमध्ये जुंपली



मॉलविरोधात संताप

हावेरी जिल्ह्यातील शेतकरी फकीरप्पा हे मुलासह मॉलमध्ये गेले होते. शेतकरी फकीरप्पा हे धोतर घालून होते. परंतु सुरक्षारक्षकाने त्यांना मॉलच्या बाहेर हाकलून दिले. तुम्ही धोतर घालून मॉलमध्ये जावू शकत नाही. तुम्हाला मॉलमध्ये जायचे असले, तर तुम्ही पॅण्ट घालून या. हा येथील नियम आहे, असे सुरक्षारक्षक सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मात्र मॉलविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनेने आंदोलन करत मॉलच्या व्यवस्थापनाने माफी मागावी अशी मागणी केली. छोटे कपडे घालून मॉलमध्ये प्रवेश दिला जातो. तर धोतर घालणाऱ्यांना का नाही, असा सवालही उपस्थित केला. त्यावर अभिनेत्री गौहर खान हिने फकीरप्पा यांचे समर्थन केले. भारताच्या संस्कृतीवर आम्हाला गर्व असल्याचे गौहर खान हिने घटनेचा व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे.

हरियाणा विधानसभा निवडणूक; सुनीता केजरीवालांकडून मोठ्या घोषणा, ‘या’ पाच योजनांचं हमीपत्रं जारी


चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा

या घटनेनंतर मॉलचे मालक आणि सुरक्षागार्ड यांच्याविरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला. कर्नाटक सरकार एेवढ्यावर थांबले नाही हा मॉल एक आठवडा बंद ठेवण्याचा आदेश दिले आहे.

महापालिकेचाही दणका

या मॉलला महानगरपालिकेकडूनही दणका देण्यात आला आहे. बेंगळुरू महानगरपालिकेने मालमत्ता कर न भरल्याप्रकरणी या मॉलवर कारवाई केली आहे. 2022-23 या वर्षाच्या एक कोटी 78 लाख रुपये मालमत्ता कर न भरल्याप्रकरणी महानगरपालिकेने मॉलला सील ठोकले आहे.

follow us