नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona)रुग्ण कमी होत असले तरी सर्दी-खोकला (Cold-cough)आणि तापाचे (fever)रुग्ण झपाट्यानं वाढताना दिसताहेत. आयसीएमआरचे (ICMR) म्हणणं आहे की, हे एका प्रकारच्या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळं (Influenza Virus)होतंय. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी देशात पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएंझाबाबत लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले की, हा कोरोनासारखा पसरतो. हे टाळण्यासाठी मास्क (Mask)घाला, सामाजिक अंतर पाळा (Social Distancing)आणि हात वारंवार धुवा. वृद्ध आणि आधीच कोणत्याही आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांना या आजारात जास्त गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
H3N2 इन्फ्लूएंझाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी आरोग्य तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यात तज्ज्ञांनी सांगितलं की, देशात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी, फ्लूचे रुग्ण वाढताहेत. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा फ्लू धोकादायक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; धुळ्यात गारपिटीनं पिकांचं नुकसान
दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीसह देशातील विविध भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. कोरोनानंतर लोकांमध्ये फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती आहे, कारण कोरोना सारखीच लक्षणं रुग्णांमध्ये दिसताहेत. गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागातून असे अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल झालेत, ज्यांना गेल्या 10-12 दिवसांपासून तीव्र तापासह खोकला येतोय.
ICMR च्या अहवालानुसार, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 चा उपप्रकार पसरतोय. देशाच्या अनेक भागांतील लोकांमध्ये या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. मेदांता हॉस्पिटलच्या वरिष्ठ संचालक सुशीला कटारियांनी सांगितलं की, हे रुग्ण इन्फ्लूएंझा-ए विषाणूच्या H3N2 स्ट्रेननं संक्रमित आहेत. फ्लूच्या रुग्णाला 2-3 दिवस जास्त ताप राहतो. अंगदुखी, डोकेदुखी, घशात जळजळ याशिवाय रुग्णाला दोन आठवडे सतत खोकला होतो. हे फ्लूच्या सामान्य लक्षणांमध्ये गणलं जातं.
आयसीएमआरचा सल्ला :
– फेस मास्क घाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
– हात नियमित पाण्यानं आणि साबणानं धुवा.
– नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा.
– खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका.
– स्वतःला हायड्रेट ठेवा, पाण्याव्यतिरिक्त फळांचा रस किंवा इतर पेये घ्या.
– ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्या.