Sangram Bhandare On Balasaheb Thorat : राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना मारण्याची धमकी देणारे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांच्या व्हिडिओने राज्यभर मोठी खळबळ उडाली असून भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी थेट धमकी दिली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
संगमनेर मधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना राजकीय पक्षांची बाजू घेऊन बोलताना गावकऱ्यांनी अभंग सोडवण्याची विनंती केली. यावर धार्मिक संघटनांनी राजकारण करून गोंधळ निर्माण केला. सोशल माध्यमांवर व इतर ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शांततेचे सर्वांना आवाहन करून धर्म पिठाचे पावित्र्य राखावे असे आवाहन केले .कीर्तनकार व समाजप्रबोधकांनी थोर संतांची परंपरा जपताना मानवतेचा धर्म पुढे न्यावा असे सांगितले. याचबरोबर संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्याचे सर्वांना आवाहन केले. असे असताना काही राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू धर्माच्या नावावर मोर्चा घडून आणला. हा मोर्चा कोणाच्या विरोधात हा मोठा राज्याला प्रश्न पडला आहे. कारण बाळासाहेब थोरात हे स्वतः वारकरी संप्रदायाचे पाईक असून हिंदू धर्मीय आहेत.
यानंतर रात्री कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट मारण्याची धमकी दिल्याने संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाचं जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
या घटनेने संगमनेर मधील गावागावांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक गावांमधून आता उद्या संगमनेर कडे कूच होणार आहे .राजकारणासाठी जातीभेद करून संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींवरून जाता संगमनेर तालुका एकवटला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा विरोधकांनी सुद्धा कायम आदर केला आहे. मात्र त्यांच्या विरोधात चितावणीखोर वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली असून पुरोगामी संघटना, हिंदुधर्मीय व वारकरी संप्रदायाने सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.