Download App

भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधीच AIADMK चा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय…

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक ( AIADMK) आणि भाजपमध्ये धूसफुस सुरु असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अण्णाद्रमुक ( AIADMK) पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं अण्णाद्रमुक ( AIADMK ) कडून जाहीर करण्यात आलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णाद्रमुक ( AIADMK ) च्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे.

AIADMK ने आज पत्रकार परिषद घेऊन औपचारिकपणे भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पक्ष मुख्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. AIADMK समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी AIADMK ने एनडीएतून बाहेर का पडत आहे. याचं कारणही स्पष्ट केलं आहे.

Chandrasekhar Bawankule : ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी फडणवीसांकडून बावनकुळेंचा बचाव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णादुराई यांनी AIADMK च्या माजी अध्यक्षा जयललिता यांच्यावर खोचक टीका केली होती. तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णादुराई आणि जयललिता यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केल्याचे AIDMK ने म्हटले आहे. सीएन अण्णादुराई आणि जे जयललिता यांची बदनामी केल्याचा आरोप केला असल्याचंही माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते केपी मुनुसामी यांनी म्हटलं आहे.

नागपूर शहर चार तासात बुडालं, हाच का तुमचा विकास? राऊतांचा फडणवीसांना सवाल

आज AIADMK पक्षाच्या कार्यालयात वरिष्ठ नेते आणि प्रमुख एडप्पादी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंर पत्रकारांनी संवाद साधताना माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते केपी मुनुसामी म्हणाले की, पक्षाने एकमताने एनडीएपासून दूर जाण्याचा आणि पुढील वर्षीच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच एकीकडे विरोधकांकडून भाजपविरोधातील सर्वच पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. इंडिया आघाडीचं संघटन करुन भाजपसमोर एक मोठं आव्हान उभं असतानाच आता तामिळनाडूमधील एनडीएमधील घटकपक्ष बाहेर पडल्याने निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जातं आहे.

Tags

follow us