Big blow to Mamata Banerjee on the eve of elections! ED arrests AIPAC chief who was campaigning : देशातील पश्चिम बंगालसह (West Bengal) पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा झटका बसला आहे. कारण पश्चिम बंगालच्या कुप्रसिद्ध घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्री प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने थेट आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या राजकीय सल्लागार संस्था आयपॅक संचालक आणि सहसंस्थापक दिनेश चंडेल यांना अटक केली आहे.
‘या’ चार राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ! जाणून घ्या 12 ही राशींचे आजचे राशीभविष्य
यामुळे आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या प्रचारावर प्रभाव पडणार का? हे देखील पाहणं तेवढेच महत्त्वाचं आहे. दरम्यान 8 जानेवारी रोजीच ईडीने आपॅकच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर 90 मिनिटातंच भावाची मोठी घोषणा, नावं बदललं
दरम्यान ईडीचा हा तपास नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केलेल्या एका एफआयआरवर आधारित आहे. या एफआयआरमध्ये पश्चिम बंगालमध्ये आयसन सोल आणि आसपासच्या कुनुस्तोरिया व काजरा या भागातील ईस्टर्न कोल्ड फील्ड्स लिमिटेडच्या खाणींशी संबंधित कोट्यावधी रुपयांच्या कोळसा चोरीच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
ऐन निवडणुकीतच भाजपला हादरा
पश्चिम बंगालच्या राजकारणातून (West Bengal) मोठी बातमी समोर आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी रविवारी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर झालेल्या या मोठ्या उलथापालथीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
