Share Bazar : आज गुरुवारी (दि.25) भारतीय शेअर बाजारात Share Bazar पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. आज दिवसभरातील ट्रेडिंग काळात गुंतवणुकदारांनी (investors)केलेल्या प्रॉफिट बुकींगचा (Profit booking)मोठा फटका मार्केटला बसला आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळाली. यात BSE सेन्सेक्स 360 अंकांनी घसरला आणि 70 हजार 700 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 101 अंकांनी घसरून 21 हजार 352 अंकांच्या पातळीवर बंद झाल्याचे दिसून आले.
“सपने नहीं हकीकत बुनते है”.. थीम साँग लाँच करत भाजपाची निवडणूक प्रचारात उडी
आज गुंतवणुकदारांनी केलेल्या प्रॉफिटबुकिंगमुळे निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये आजच्या व्यवहारात कमजोरी दिसून आली. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक थोड्याफार प्रमाणात हायवर बंद झाले.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, कर्नाटकात भाजपकडून मोठा धक्का
आज गुरुवारी, निफ्टी ऑटो निर्देशांकात किंचित वाढ नोंदवली गेली तर निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी (Nifty FMCG)आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही कमजोरी दिसून आली.
प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर बाजार दिवसभरातील हायवरुन 700 अंकांनी घसरला. त्याचबरोबर निफ्टी देखील उच्चांकावरुन 200 अंकांनी घसरला. आयटीसह एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंगमुळे चांगलीच घसरण पाहायला मिळाली.
बजाज ऑटो, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली तर टेक महिंद्रा, सिप्ला, भारती एअरटेल आणि एलटीआय माइंड ट्रीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात कमजोरी दिसून आली.
आज शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे तब्बल 9 हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती समजते आहे. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये चांगलीच घसरण दिसून आली. 24 जानेवारीला बीएसईवर लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केटकॅप 371.19 लाख कोटी होती तर आज ती मार्केटकॅप 371.28 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. अर्थात गुंतवणुकदारांना जवळपास 9 हजार कोटींचा फटका बसला आहे.