मोठी बातमी! देशातल्या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका रद्द…

नवी दिल्ली : देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 30 एप्रिलला मतदार प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा..! खतांच्या अनुदानाबाबत मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव […]

Ahmednagar

Ahmednagar

नवी दिल्ली : देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 30 एप्रिलला मतदार प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा..! खतांच्या अनुदानाबाबत मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर

निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव राकेश मित्तल यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशभरातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश होता.

महाराष्ट्रातील एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका येत्या 30 एप्रिल रोजी होणार होत्या. या निवडणुकांसाठी स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु होती. विविध जिल्ह्यांत राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती.

मढी देवस्थानचा मोठा निर्णय, तिखटाचा नैवेद्य नको, तर…

इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची फाईलच तयार करुन ठेवली होती. येत्या 21 मार्चला या निवडणुकांसाठी अर्जांची विक्री होणार होती. तर 30 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, अचानक ही निवडणूक रद्द झाल्याने इच्छूक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालंय.

निवडणूक रद्द होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने जोर धरत आहे. अशातच निवडणूक जाहीर झाल्याने देशातल्या काही कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचंही समोर आलं आहे. एकंदरीत निवडणूकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकल्यानेच निवडणूक रद्द झाली असावी, असा सूर काही नागरिकांमधून उमटत आहे.

Exit mobile version