Download App

Bihar Boat Accident : शाळकरी मुलांनी भरलेली बोट नदीत उलटली, 18 मुले बेपत्ता, शोध मोहिम सुरू

  • Written By: Last Updated:

Bihar Boat Accident : बिहारमधील मुझफ्फरपूर (Muzaffarpur) मध्ये मोठी दुर्घटना घडली. गायघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोनियाबाद ओपी येथील बागमती नदीतून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बोटीचा मोठा अपघात झाला आहे. या बोटीत 33 शाळकरी मुले होती. या घटनेतील काही मुलांना वाचवण्यात य़श आलं असून 18 मुले अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेनं परिसरात एकच बळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी रोज बोटीने बागमती नदी पार करतात. आजही सकाळी 33 मुले नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी बोटीत बसली होती. मात्र, काही अंतर गेल्यावर बोट पाण्यात बुडाली. घटनास्थळी उपस्थित खलाशी आणि स्थानिक लोकांनी पाण्यात उडी मारून काही मुलांना वाचवले. मात्र, अद्याप 18 मुले बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. नदीच्या काठावर शेकडो लोकांची गर्दी जमली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दानवेंच्या चिठ्ठीने कार्यक्रम! ‘मी खानदानी मराठा, गद्दारी रक्तात नाही’; जरांगेंनी CM शिंदेंसमोरच सांगितलं 

स्थानिक रहिवासी राकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुले होती. त्यामुळे बोट नदीच्या मधोमध गेल्यावर डगमगू लागली. आण काही वेळातच बोट पाण्यात उलटली. बोट बुडत असल्याचे पाहून खलाशांसह स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या होत्या.

या दुर्घटनेनंतर गावकरी प्रचंड संतापले आहेत. दरवर्षी पाऊस पडल्यानंतर नदीतील पाणी वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागत आहे, तर अनेक दिवसांपासून पूल बांधण्याची मागणी होत आहे. याशिवाय घटनेची माहिती मिळूनही एक तासाहून अधिक काळ एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गायघाट आणि बोनियााबाद ओपी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. एसडीआरएफची टीमही बचाव कार्यात सहभागी झाली आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या बोटीत काही महिलाही होत्या असे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दौऱ्याआधीच गोंधळ

मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी मुजफ्फरपूरला भेट देणार आहेत. यापूर्वी घडलेल्या या मोठ्या अपघाताने प्रशासनात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या अपघाताबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी घडलेल्या घटनेला विरोधी पक्ष लक्ष्य करणार हे निश्चित मानले जात आहे. या अपघातानंतर मोठा राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे.

 

 

Tags

follow us