Nitish Kumar : दिल्लीमध्ये ‘INDIA’ आघाडीची बैठक झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यावर नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण INDIA आघाडीवर (India Alliance)नाराज असण्याचं काही कारण नाही, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी भाजप नेते सुशील मोदी (Sushil Modi)यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सुशील मोदी काहीही बोलत राहतात. त्यांच्या बोलण्यात काहीही अर्थ नसतो, असा हल्लाबोल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे.
तंजावरच्या ‘या’ खास वास्तूत होणार 100 व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलन प्रारंभ
अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी माझ्याकडे तीन खात्यांची जबाबदारी दिली होती. ते आपल्याला खूप मान देत होते. अटलजींबद्दल आपल्या मनात कायम आदराची भावना आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते.
‘अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो’; शड्डू ठोकल्यानंतर दादांचं आव्हान
त्यांनीच आपल्याला इथे मुख्यमंत्री केले आहे. आज देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 99 वी जयंती आहे. त्यांची जयंती देश दरवर्षी सुशासन दिन म्हणून साजरी करतो. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुशील मोदी यांनी मुख्यमंत्री आणि जेडीयू पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
लवकरच जेडीयू हा पक्ष आरजेडीमध्ये विलीन होईल, असं ते म्हणाले होते. त्यावर नितीश कुमार म्हणाले की, आजकाल ते काहीही बोलत असतात. आमच्या पक्षाचे काहीही होणार नाही. त्याचवेळी त्यांचं काम चांगलं होतं, आपण आयुष्यभर त्यांचा आदर करु असंही यावेळी ते म्हणाले.
दुसरीकडे, ‘INDIA’ आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्यांवर नितीश कुमार म्हणाले की, ‘INDIA’ आघाडीवर आपण नाराज आहोत, असं काही नाही. नितीश यांनी INDIA’ आघाडीवरील नाराजीच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले की, मला INDIA आघाडीवर अजिबात राग नाही. मला काहीही नको, मग मी का रागावणार? असा सवालही यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपस्थित केला.