Bihar Politics : बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना जोरदार झटका दिला आहे. सोमवारी पटना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जेडीयू नेते सुनील कुमार सिन्हा, मालती कुशवाहा, मनीष, संजय सिन्हा, चंद्रभूषण यादव, आनंद शंकर याच्यासह अन्य पक्षांतील नेते भाजपात सामील झाले. चौधरी यांनी या नेत्यांना भाजप सदस्यत्व दिले.
यानंतर त्यांनी जेडीयू आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. बिहारमधील सर्वच 40 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही.
मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
यावेळी कार्यालयात 13 जुलै रोजी पटना विधानसभा मार्च दरम्यान झालेल्या लाठीमाराच्या विरोधात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या घटनांची माहिती देणारे प्रदर्शनही येथे भरविण्यात आले होते. शांतीपूर्ण पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीवर आधुनिक जनरल डायर नितीश बाबू यांच्या पोलीस गुंडांचा लाठी चार्ज आणि वंशवादाच्या विरोधात स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्याचा संदेश देण्यात आल्याचे चौधरी म्हणाले. हे अभियान नितीश कुमार यांच्या सरकार घालविण्याच्या दृष्टीने महत्वाचे सिद्ध होईल, असेही चौधरी म्हणाले.
दरम्यान, सत्ताधारी जेडीयूला बिहारमध्ये मोठी गळती लागली आहे. देशात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधीत विरोधकांची आघाडी तयार करण्यात नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यांच्या राज्यात पक्ष कमजोर होत चालला आहे. जेडीयुतील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काही जणांनी तर भाजपात प्रवेशही केला आहे. काही नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
आप खासदारावर सभापतींची कारवाई, संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित