Biogas best solution to LPG shortage during war, the government also provides subsidy : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात झाल्याचं पाहायला मिळात आहे. कारण देशाला याच युद्धजन्य इराण आणि आखाती देशांकडून स्वयंपाक घरात वापरला जाणारा एलपीजी गॅस पुरवठा होतो. आता एलपीजी पुरवठा थांबला, देशातील गॅस संपला अन् अनेक उद्योग व्यवसाय ठप्प तर हॉटेलांना टाळे लागलेय पण महिलांना स्वयंपाक चुकणार कसा? त्यामुळे गॅसला पर्याय शोधत अनेकींनी इलेक्ट्रीक शेकड्या, इंडक्शन्स तर काहींनी थेट चुली पेटवल्यात. पण या सगळ्यात एलपीजीला सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीला सरकार अन् लोकांनी दुर्लक्षित केले. त्यामुळे हा पर्याय नेमका काय? तो आमलात कसा आणायचा? त्यासाठी सरकार कसं अनुदान देत? जाणून घेऊ सविस्तर…
गॅस टंचाईमध्ये एलपीजीसाठी सर्वोत्तम ठरणार पर्याय कोणता?
युद्धा दरम्यान निर्माण झालेल्या गॅस टंचाईला आणि एलपीजीला पर्याय म्हणून नाही तर पूरक म्हणून त्याचबरोबर आयात पेट्रोलियम पदार्थांवरचं अवलंबित्व कमी करण्याचे उद्देश म्हणून ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक किंवा सामूहिक पातळीवर बायोगॅस संयंत्र किंवा प्लांट कार्यक्षमतेने शाश्वत ऊर्जास्रोत ठरू शकतो. हा काही एखादाहायपोथेसिस नाही तर अनेक वर्षांपूर्वी हे सिद्ध झालेलं आहे. की, बायोगॅस द्वारे स्वयंपाक घरामध्ये एलपीजी प्रमाणेच शेगडी चालते आणि स्वयंपाक केला जाऊ शकतो.
बायोगॅस निर्माण कसा करायचा आणि वापरायचा कसा?
बायोगॅस प्लांट मध्ये डायजेस्टर कंटेनर आणि वर्णन असे तीन घटक असतात. यातील डायजेस्टरमध्ये तुमच्या स्वयंपाक घरातील कचरा, जनावरांची आणि मानवी विष्ठा, शेती पिकातील अवशेष हे सर्व विघटनशील पदार्थ टाकता येतात. मात्र त्या अगोदर या कचऱ्याचे त्याचे बारीक तुकडे करणे गरजेचे असते. जेणेकरून कोणताही कचरा घन राहणार नाही आणि गॅस निर्मितीमध्ये अडथळा येणार नाही. यासाठी हा कचरा क्रशरमधील बसलेल्या सिंक मधून गाळून घ्यावा. ज्याचा एक लगदा बनतो. हा कचरा कचरा मिक्सरमधूनही बारीक करता येतो.
ब्रेकिंग : धर्मांतरानंतर अनुसूचित जातीचा दर्जा दिला जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
बायोगॅसमध्ये लागणारे डायजेस्ट हे एका मोठ्या टाकी सारखे बांधकाम असते. ज्यामध्ये हा गॅस तयार होतो. या डायजेस्टरमध्ये हे सर्व विघटनशील कचरा टाकला जातो. कालांतराने यामध्ये बायोगॅस तयार होतो. ही टाकी सिंटेक्स टाकी असते किंवा प्लास्टिक टाकीमध्ये देखील हा गॅस निर्माण केला जाऊ शकतो. डायजेस्टरसह या प्रकल्पामध्ये एक गॅस साठवणारा कंटेनर असतो. ज्यामध्ये गॅस तयार झाल्यानंतर वरच्या बाजूला कंटेनरमध्ये साठवला जातो. त्यानंतर साठवलेला गॅस हा वापरासाठी गॅस पाईप द्वारे शेगडीशी जोडला जातो. या ठिकाणी स्वयंपाक केला जातो.
या बायोगॅसचे फायदे नेमके काय?
सध्याच्या काळात बायोगॅसचा पहिला फायदा आहे तो म्हणजे एलपीजीला एक सर्वोत्तम पर्याय. तर तज्ञांच्या मते बायोगॅसचा खर्च केवळ बांधकामा पुरता मर्यादित आहे. एकदा उभारणी झाली की अनेक वर्ष मोफत इंधन मिळतं. एका बायोगॅस सयंत्राद्वारे तीन ते पाच व्यक्तींच्या जेवण सहज बनवता येतं. त्याचबरोबर बायोगॅससाठी लागणाऱ्या शेणामुळे शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल वाढतो आणि दुग्ध व्यवसायालाही प्रोत्साहन मिळतं. शहरांचा विचार केला तर घरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महानगर पालिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा कचऱ्याची विल्हेवाट अन् गॅस निर्मिती दोन्ही साध्य होतं. तसेच या गॅस निर्मिती दरम्यान उप- उत्पादन म्हणून सेंद्रीय खत देखील मिळतं. जे बागांसाठी वापरलं जाऊ शकतं.
महिला आरक्षण बदलवणार देशाचं राजकीय चित्र! लोकसभेच्या देशात 816 तर राज्यात वाढणार एवढ्या जागा…
बायोगॅस उभारणीसाठी शासनाकडून आणि विविध संस्थांकडून प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये तर सरकार या प्रकल्पांना सबसिडी देते. पुर्वी यामध्ये खादी ग्रामोद्योक आणि नाबार्ड सारख्या संस्था असायच्या तर या सबसिडीची रक्कम 9 हजार 800 ते 70 हजार 400 दरम्यान असते. भगीरथ प्रतिष्ठान संस्थेकडून 5000 रुपयांच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड मदत म्हणून दिला जातो. आर्थिक मदतच नाही तर बायोगॅस उभारण्यासाठी लागणारे कुशल गवंडी देखील त्यांच्याकडून पुरवले जातात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कायम चर्चेत असलेली ही बायोगॅस चळवळ कुठे हरवली असा प्रश्न या गॅस टंचाईच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याचं कारण म्हणजे बायोगॅस निर्मिती असो किंवा त्यासारख्या गोष्टी या स्थानिक कच्चा माल वापरून, पक्का माल तयार करतात त्यामुळे ते मार्केटमध्ये कमोडिटी म्हणून येत नाही. त्याला जास्त भांडवल लागत नाही. त्यांना मार्केट मिळणार नसते. पण जगभरातील भांडवलशाही व्यवस्थेला कोणत्याही आर्थिक प्रश्नाला कॉर्पोरेट केंद्री, प्रचंड भांडवल रिचवु शकणारे, दरवर्षी विक्री, नफा आणि शेयर प्राईस वाढवणारे सोल्युशन हवे असते.
