Ram Mandir Pran Pratishtha: भाजपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटचे बॅकग्राउंड पोस्टर बदलले आहे. भाजपने राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठाची (Ram Mandir Pran Pratishtha) तारीख 22 जानेवारी 2024 आणि अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) नवीन बॅकग्राऊड पोस्टर केले आहे.
भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या नवीन बॅकग्राउंड पोस्टरमध्ये अयोध्येच्या राम मंदिरात होणाऱ्या राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख ’22 जानेवारी 2024′ यासह ‘जय श्री राम’ घोषणा लिहिली आहे.
नवीन बॅकग्राउंड पोस्टरमध्ये काय आहे?
या नवीन बॅकग्राऊंड पोस्टरमध्ये अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा फोटो लावण्यात आला असून त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हात जोडलेले दिसत आहेत. या पोस्टरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी कधी जाणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामजन्मभूमी मंदिरात भगवान श्री राम लल्ला सरकारच्या श्री विग्रहाची प्राण प्रतिष्ठा करतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील 4 हजार संत-महात्मे आणि 2500 मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संघप्रमुख मोहन भागवतही सहभागी होणार आहेत.
मॅथ्यू रोडचे नाव बदलणार, मंत्री लोढा राजकारण करत असल्याचा स्थानिकांचा आरोप
भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात पुढील वर्षी 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. हे पाहता देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ‘टेंट सिटी’ उभारण्यात येत असून, त्यामध्ये 80 हजार भाविकांची राहण्याची सोय होणार आहे.
कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
देश-विदेशातील लाखो लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुचनेनुसार श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि अयोध्या विकास प्राधिकरणातर्फे ठिकठिकाणी ‘टेंट सिटी’ उभारली जात आहेत. यामध्ये राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाईल.