BJP cheated and looted 100 seats, remove me, I will not resign; What did Mamata say in the meeting मी हरलेली नाही. मी राजीनामा देणार नाही अशी थेट घोषणा ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या निकलांनंतर आज (दि.5) पत्रकार परिषदेत केली आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एखाद्या मुख्यमंत्र्याने पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी आमदारांची बैठक घेतली. त्यामध्ये देखील त्या राजीनामा न देण्यावर ठाम होत्या. तसेच या बैठकीमध्ये त्यांनी आमदारांना काही सूचना देखील दिल्या. त्या काय म्हणाल्या?
मला काढा, राजीनामा देणार नाही…
ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आमदारांची बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी भाजपवर निवडणुकीत फसवणूक केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर आपण राजीनामा देणार नसल्याचे देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. त्या म्हणाल्या की, भाजपने चुकीच्या पद्धतीने शंभर जागा लुटल्या आहेत. हा जनादेश नाही तर फसवणूक आहे. त्यामुळे मी स्वतःहून राजीनामा देणार नाही. राज्यपालांनी मला पदावरून काढून टाका. मी त्याचीच वाट बघत आहे.
आम्ही जनतेच्या कौलाच्या विरोधात जाणार नाही; डीएमकेने फेटाळला एआयडीएमकेचा युतीचा प्रस्ताव
त्याचबरोबर या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी आमदारांना अधिवेशनामध्ये जाताना पहिल्या दिवशी काळे कपडे घालून निषेध नोंदवण्याचे आवाहन केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, आपण नैतिकदृष्ट्या जिंकलो आहोत मात्र भाजपने सत्तेचा गैरवापर केल्याने ते सत्तेत आले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी पक्षाशी प्रतारणा केली आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा देखील इशारा मामतांनी दिला आहे. दरम्यान या बैठकीमध्ये तृ डबल काँग्रेसचे दहा आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
