Download App

कर्नाटकात सत्तारूढ होण्यासाठी BJP कुमारस्वामींच्या संपर्कात, कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, कुमारस्वामींशी संपर्क होईना?

BJP in touch with Kumaraswamy to come to power in Karnataka : कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress Karnataka)गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. सध्या मतमोजणी सुरू असून निकालानुसार काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. कर्नाटकात भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात सत्ता गमवावी लागत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस बहुमताच्या जवळ जाताना दिसत असली तरी बहुमत मिळत नाहीये. यामुळे जेडीएस पुन्हा एकदा भाव खाणार आहे. मात्र, यावेळी भाजपने पुन्हा एकदा जेडीएसच्या नेत्यांना आपल्या गोटात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

IB71 film review | सत्य घटनेवर आधारित | LetsUpp Marathi

कर्नाटकात पुन्हा एकदा सत्तेचे राजकारण रंगणार आहे. गेल्या वेळीही लोकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केले. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. पण काँग्रेस नेत्यांनी कुमारस्वामींना खूप त्रास दिला. कुमारस्वामी एका कार्यक्रमात रडले पडले. यानंतर भाजपने जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता उलथवली.

आताही तीच परिस्थिती होताना दिसत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपला ७८, काँग्रेसला ११५, एनआयजेडीला २६ आणि इतरांना ५ मते मिळाली. दरम्यान, पुढील अर्धा तास कर्नाटकच्या राजकारणासाठी गेम चेंजर ठरू शकतो. काँग्रेसने सुरुवातीच्या टप्प्यापासूनच हालचाली सुरू केल्या असून, विजयी झाल्यास आघाडीच्या उमेदवारांना बंगळुरूमध्ये आणण्याची तयारी सुरू केली आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे.

Karnataka Election : काँग्रेस नेत्याचा दावा! ‘या’ एकाच घोषणेनं केला भाजपाचा पराभव निश्चित

या आमदारांना गेल्यावेळेप्रमाणे हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या रणनीतीसाठी काँग्रेसने आज दुपारी १२ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. गरज पडल्यास जेडीएसशी हातमिळवणी करण्याबाबतही चर्चा होईल. तशाच हालचाली BJP कडून सुरू झाल्या आहेत. जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा सुरू झाल्या आहेत. कुमारस्वामी काल सिंगापूरला रवाना झाले. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्याशी तातडीने संपर्क साधणे कठीण होणार आहे. अशा स्थितीत भाजपने कुमारस्वामी यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. या निवडणुकीत जेडीएस पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतो. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. त्यामुळं भाजप पुन्हा सत्तारूढ होतो का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us