देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Election) निकालाची उत्सुकता देशाला लागली आहे. काही तासांत केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदूचेरी मधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून कोणाची सत्ता येणार हे देखील स्पष्ट होईल अशातच. भाजप वरिष्ठ नेते पी.सी.जॉर्ज यांनी थेट आपल्याला ‘आमदार झाल्यासारखं वाटतं असल्याचं म्हटले आहे. तसंच, आपण एक कोटी रुपयांची पैज लावायला तयार असल्याचे देखील म्हटलं आहे.
एकीकडे केरळमध्ये डाव्यांची सत्ता कालसा होईल असे भाकीत एक्झिट पोल्समधून केले जात आहेत. केरळमध्ये सोमवारी (ता.४) मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. त्याच्याआधी मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी सोशल मीडिया हँण्डलवरून त्यांच्या पदाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यांनी केलेल्या या कृतीमुळे आता तर्कवितर्क काढले जात असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
Live Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला! कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
अशातच भाजपचे जॉर्ज यांनी ओपण चॅलेंज देत तब्बल एक कोटी रुपयांची पैज लावायची तयारी दाखवली आहे. त्यांनी, आपण मोठ्या मताधिक्क्यानं विजयी होणार असून यात कोणाला संशय असेल तर त्यांनी समोर यावं. आपण एक कोटी रुपयांची पैज लावायला तयार आहोत. भाजपचे नेते जॉर्ज हे पूंजार मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांचा मुलगा हा देखील पाला विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहे. जॉर्ज यांनी यावेळी फक्त आपल्याबाबत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला नाही, तर त्यांचा मुलगाही विजयी होईल असे म्हटले आहे.
विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी दोघेही विधानभवनात प्रवेश करु, असा दावा केला आहे. तसेच केरळमध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वात भाजपला मोठे यश मिळणार असून भाजप सत्तेत येईल. इतर कोणत्या पक्षाला हुमत मिळणार नाही. पण काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूडीएफला सर्वाधिक जागा मिळतील, असाही अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर माकपच्या नेतृत्त्वातील एलडीएफला देखील जागा मिळतील असे म्हणत भाजपला 1 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोण आहेत पी.सी. जॉर्ज?
जॉर्ज हे केरळमधील भाजपचे अनुभवी नेते असून ते सातवेळा आमदार झाले आहेत. आता २०२६ मध्ये देखील ते पक्षाकडून उमेदवार असून ते पुंजारमधील लोकप्रिय नेते आहेत. जॉर्ज यांच्यासमोर विद्यमान आमदार कुलंथुकल आणि यूडीएफचे साजी जोसेफ यांचं आव्हान आहे. पूंजार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण जॉर्ज हे गेल्या तीन एक दशकापासून सहा वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. तसेच जार्ज यांनी 2019 मध्ये केरळ जनपक्षम सेक्युलर पक्ष स्थापन केला होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तो त्यांनी भाजपमध्ये विलीन केला.
