Download App

सरकारसाठी रात्रभर काम अन्… भाजप आमदाराचं महिला सचिवाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

BJP MLA मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला सचिवाबाबत अक्षेपार्ह विधान केलं आहे. ज्यावर महिला आयोग आणि उच्च न्यायालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.

BJP MLA Contervercial Statement on Lady Secretary of CM Office in Karnataka : दररोज कुठले ना कुठले राजकीय नेते वादग्रस्त वक्तव्य करताना पाहायला मिळतात. त्यात आता पुन्हा एकदा एका भाजप आमदाराने मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला सचिवाबाबत अक्षेपार्ह विधान केलं आहे. ज्यावर आता राज्य महिला आयोग आणि उच्च न्यायालयाला पत्र पाठवून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटक विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार एन. रवी कुमार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे अध्ययन सचिव शालिनी रजनीश यांच्याबाबत हे वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले की, टमुख्य सचिव या सरकारसाठी रात्रभर काम करतात आणि पूर्ण दिवस मुख्यमंत्र्यांसाठी’. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

विजयी मेळावा अन् मविआत फूट? काॅंग्रेसनंतर शरद पवारही राहणार दूर

हे वक्तव्य महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारं आहे. त्यामुळे याबाबत महिला अधिकार गटाने डीजीपीकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर राज्य महिला आयोगाने आणि उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे पत्र देण्यात आलं आहे. ज्यामध्ये एन. रवी कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वक्तव्य केवळ शालिनी रजनीश यांच्यासारख्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठान नुकसान पोहोचते. त्याचबरोबर हा सर्वच महिला वर्गाचा अपमान आहे. असं ही म्हटलं जात आहे.

follow us