BBC : बीबीसी आणि काँग्रेसचा अजेंडा एकसाथ.. भाजपने दिली प्रतिक्रिया..

BBC Income Tax Raid – बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर छापे सुरूच आहेत. या कारवायांमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी मोदी सरकार सडकून टीका सुरू केली आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर या प्रकरणावर आता भारतीय जनता पार्टीनेही (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी […]

_LetsUpp

BBC

BBC Income Tax Raid – बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर छापे सुरूच आहेत. या कारवायांमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी मोदी सरकार सडकून टीका सुरू केली आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर या प्रकरणावर आता भारतीय जनता पार्टीनेही (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी पत्रकार परिषद घेत बीबीसीला सर्वात भ्रष्ट आणि मूर्ख कॉर्पोरेशन म्हटले आहे. बीबीसीच्या कारवाया पाहिल्या तर ही संस्था जगभरात सर्वाधिक भ्रष्ट बनली आहे.

बीबीसीवर आयकर विभाग नियमानुसार कारवाई करत आहे. कारवाई सुरू असताना राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. काँग्रेस (Congress), टिएमएसी (TMC), समाजवादी पार्टी (Samajwadi Party) असो हे भारतीयांसाठी काळजीचे कारण आहे. भारत हा देश संविधान आणि कायद्यानुसार चालतो, हे काँग्रेसला समजायला हवे. आज कोणतेही मिडीया संस्था असो किंवा कंपनी असो जर भारतात काम करत असेल तर त्यांना भारतातील कायद्यांनुसारच काम करायला हवे. जर कंपनी बरोबर काम करत असेल तर घाबरण्याचे कारण काय, असा सवाल भाटिया यांनी उपस्थित केला. आयकर विभागाला त्यांचे काम करू दिले जावे. दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

बीबीसीचा प्रोपगेंडा आणि काँग्रेसचा अजेंडा एक साथ काम करत आहेत. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी सुद्धा बीबीसीवर बंदी घातली होती. बीबीसीने होळीच्या सणावरही टिप्पणी केली होती. ही उदाहणे पुरेशी आहेत, असे भाटिया म्हणाले.

दरम्यान, दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली (Delhi) कार्यालयात ६० ते ७० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. बीबीसी कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही आवारात प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी नाही. आयकर विभागाकडून हा छापा नसून हे सर्वेक्षण आहे.आयकर विभागाकडे तक्रार झालेल्या तक्रारीनुसार हे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

Exit mobile version