टेस्लाची भारतात मोठी घोषणा! रोडस्टरचे बुकिंग सुरू, मॉडेल वाय एलवर मोफत एक्सलरेशन बूस्ट

कंपनीने आपल्या बहुप्रतीक्षित रोडस्टर या स्पोर्ट्स कारच्या बुकिंगला सुरूवात केली असून, या कारचे उत्पादन 2028 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Untitled Design   2026 10 18T181018.506

Untitled Design 2026 10 18T181018.506

Bookings for Tesla cars begin in India : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे भारतातील ग्राहकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या बहुप्रतीक्षित रोडस्टर या स्पोर्ट्स कारच्या बुकिंगला सुरूवात केली असून, या कारचे उत्पादन 2028 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या घोषणेमुळे टेस्लाच्या नव्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. रोडस्टरच्या परफॉर्मन्स व्हेरिएंटसाठी बुकिंग करताना 5 लाख 1 हजार रुपये भरावे लागणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर पुढील 10 दिवसांत 45 लाख 5 हजार रुपये भरावे लागतील. अशा प्रकारे बुकिंगसाठी एकूण 50 लाख 6 हजार रुपयांची रक्कम आवश्यक ठरते. मात्र ही रक्कम कारची भारतातील अंतिम एक्स शोरूम किंमत नसून, कंपनीकडून भारतातील विक्रीची अंतिम किंमत आणि उपलब्धतेबाबत अद्याप स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही.

टेस्ला रोडस्टरमध्ये परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट असे व्हेरिएंट अपेक्षित आहेत. या कारच्या डिझाईनमध्ये एसआर-71 आणि एफ-35 या विमानांपासून प्रेरणा घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच, कारच्या कामगिरीसाठी स्पेस एक्सशी संबंधित तंत्रज्ञान आणि घटकांचा वापर करण्याची संकल्पना देखील चर्चेत आहे. सुरूवातीच्या टप्प्यात ही कार लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणांवरून वाद, कॉकरोच जनता पार्टीच्या 300 हून अधिक अज्ञात समर्थकांविरोधात गुन्हा

दरम्यान टेस्लाचे भारतातील मॉडेल वाय एल या सिक्स सतार इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी देखील ग्राहकांना आकर्षित करणारी घोषणा केली आहे. या मॉडेलवर कंपनीकडून मोफत ऍक्सलरेशन बूस्ट देण्यात येत आहे. या सुविधेमुळे कारचा शून्य ते 100 किलोमीटर प्रतितास वेग गाठण्याचा वेळ 4.5 सेकंदांपर्यंत कमी होतो, असा कंपनीचा दावा आहे. मॉडेल वाय एल ची डब्लूएलटीपी प्रमाणित रेंज एका चार्जमध्ये 681 किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे.

किमतीबाबत बोलायचं झालं तर, भारतात टेस्ला मॉडेल वायची किंमत 50 लाख 81 हजार रुपये, तर मॉडेल वाय एल ची किंमत 61 लाख 99 हजार रुपये असल्याची माहिती आहे. ग्राहकांसाठी ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे. दिलेल्या वित्तपुरवठा अटींनुसार, सहा लाख रुपये डाऊनपेमेंट केल्यानंतर मॉडेल वाय साठी मासिक ईमएमआय 39 हजार 990 रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर मॉडेल वाय एल साठी साडेसहा लाख रुपये डाऊनपेमेंट केल्यास 49 हजार 990 रुपयांपासून सुरू होण्याचा पर्याय आहे. हे हप्ते सात वर्षांचा कालावधी आणि वार्षिक 8.5 टक्के हप्ता-वाढ गृहीत धरणाऱ्या वित्तपुरवठा योजनेवर आधारित आहेत.

एकीकडे रोडस्टरच्या बुकिंगमुळे टेस्लाच्या भविष्यातील स्पोर्ट्स कारकडे लक्ष वेधले गेले आहे, तर दुसरीकडे मॉडेल वाय एल वरील मोफत ऍक्सलरेशन बूस्ट आणि ईएमआय पर्यायांमुळे भारतीय ग्राहकांसाठी कंपनीची ऑफर अधिक चर्चेत आली आहे. मात्र रोडस्टरची अंतिम भारतीय किंमत, विक्रीची तारीख आणि प्रत्यक्ष उपलब्धतेबाबत कंपनीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे.

Exit mobile version