Download App

व्हॅलेंटाईन डे निमित्त बेंगळुरूमध्ये झळकलं अजब पोस्टर; फक्त ३८९ द्या अन् मिळवा भाड्याने बॉयफ्रेंड

या विचित्र पोस्टर्सवर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर बेंगळुरू पोलिसांना टॅग केले आहे आणि अशी पोस्टर्स

  • Written By: Last Updated:

Boyfriend for Rent in Bengaluru for Valentine’s Day : व्हॅलेंटाईन डे निमित्त बेंगळुरूमध्ये असे काही पोस्टर्स लागले आहेत, ज्यांनी लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. , “एक बॉयफ्रेंडला भाड्याने घ्या असं या पोस्टर्सवर लिहिले आहे. (Valentine’s ) तसंच, एक QR कोड देखील देण्यात आला आहे. ₹३८९ मध्ये एका दिवसासाठी भाड्याने देण्याची ऑफर देण्यात आली आहे, ज्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका दिवसासाठी बॉयफ्रेंड ₹३८९ मध्ये!

बेंगळुरूमधील जयनगर आणि बनशंकरी भागात भिंतींवर हे पोस्टर्स चिकटवलेले दिसले. पोस्टर्सवर लिहिले होते, ‘ बॉयफ्रेंड भाड्याने मिळवा फक्त ₹३८९ मध्ये. तसंच, येथील कोड स्कॅन करा.’ याचा अर्थ असा की फक्त ₹३८९ मध्ये एका दिवसासाठी बॉयफ्रेंड भाड्याने घेता येतो. जयनगर आणि बनशंकरी बीडीए कॉम्प्लेक्सच्या ८ व्या ब्लॉकजवळ हे पोस्टर्स दिसले आहेत.

भारीच.. व्हॅलेंटाईन डे निमित्त ;प्रेमाची गोष्ट चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल..

या विचित्र पोस्टर्सवर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर बेंगळुरू पोलिसांना टॅग केले आहे आणि अशी पोस्टर्स लावून शहराची संस्कृती खराब करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांचं म्हणणे आहे की अशा जाहिराती समाजाला चुकीचा संदेश देतात आणि तरुणांना दिशाभूल करतात. सध्या, हे पोस्टर्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत आणि लोक अशा ऑफर्सवर टीका करत आहेत.

बरेच लोक याला व्हॅलेंटाईन डे वरील विनोद म्हणत आहेत, तर काही लोक याला समाजासाठी धोकादायक ट्रेंड म्हणत आहेत. या घटनेमुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात अशा वादग्रस्त जाहिराती आणि त्यांचा समाजावर होणारा परिणाम यावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

follow us