Download App

ब्रृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा, लैंगिक छळप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर

  • Written By: Last Updated:

BrijBhushan Sharan Singh : भाजप खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (BrijBhushan Sharan Singh)यांना आज दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला. कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने (Delhi Rouse Avenue Court) ब्रृजभूषण यांना जामीन मंजूर केला आहे. ब्रृजभूषण यांना जामिना देतांना कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत. (brijbhushan sharan singh got bail in sexual abuse case)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

दिल्ली न्यायालयाने ब्रृजभूषण यांच्यासह महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर सिंग यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. दोघांनाही प्रत्येकी 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

न्यायालयाने अनेक अटी घातल्या

भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांना जामीन मंजूर करण्यासोबतच राऊस एव्हेन्यू कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत.
न्यायालयाने जामीन देताना सांगितले की, आरोपींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तक्रारदार किंवा साक्षीदारांना भेटून प्ररावृत्त करता येणार नाही, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये.

18 जुलैला जामीन मिळाला, आज पुन्हा सुनावणी
लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करत असलेल्या ब्रृजभूषण यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली आणि दुपारी चार वाजेपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर ठीक 4 वाजता कोर्टाने कामकाज सुरू केले आणि या ब्रृजभूषण यांना जामीन मंजूर केला. निकालापूर्वी न्यायालयात आज दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. ब्रजभूषण यांच्या जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारले, तुम्ही जामिनाला विरोध करत आहात का? दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, आम्ही न्यायालयाला कायद्यानुसार निर्णय घेण्यास विरोध करत नाही किंवा समर्थनही करत नाही.

काय आहे प्रकरण?

ब्रृजभूषण यांच्यावर ६ महिला कुस्तीपटू आणि एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचा आरोप केला होता. या तक्रारीत चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, असे आरोप करण्यात आले होते. मात्र, हे आरोप ब्रृजभूषण यांनी फेटाळले होते. या आरोपांनंतरही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे पैलवानांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. या प्रकरणाची चौकशी करून शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी ब्रृजभूषण यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, लैंगिक छळाच्या आरोपांनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह या प्रकरणात पहिल्यांदाच 18 जुलै रोजी दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जामिनाची विनंती केली. दरम्यान, कुस्तीपटूंच्या विरोधानंतरही आज अखेर ब्रृजभूषण यांना जामीन मिळाला आहे.

Tags

follow us