Download App

Budget 2025 : विमा क्षेत्रात शंभर टक्के विदेशी गुंतवणूक, अर्थमंत्री सितारामण यांची मोठी घोषणा

बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विमा क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने नवे व्हिजन मांडले. 

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2025) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलं पूर्ण बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे लक्ष होतं. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसेच विमा क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने नवे व्हिजन मांडले. विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणूक आणण्यासाठी सरकारने आधीच प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर आज अर्थसंकल्प सादर करताना वित्त मंत्री सितारामण यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. यांसह त्यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.

बजेटमधील महत्वाच्या बाबी

भारतीय खेळणी उद्योगासाठी सपोर्ट स्किम
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये.
स्वस्त दरात शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत कर्ज देणार. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पाच वर्षांचे पॅकेज.
कृषी योजनांचा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार.

Tags

follow us