Infosys Co-Founder Kris Gopalakrishnan : बेंगळुरूमध्ये इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती ख्रिस गोपालकृष्णन यांच्याविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Infosys) याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे (आयआयएससी) माजी संचालक बलराम आणि अन्य 16 जणांवरही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, बेंगळुरूच्या 71 व्या दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या (सीसीएच) निर्देशानुसार सदाशिव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा दुर्गाप्पा आदिवासी बोवी समाजातील आहे. तसंच, आपल्याला हनी ट्रॅप प्रकरणात गोवल्याचा आरोप त्यांनी केला. आणि नंतर (IISc)च्या सेवेतून काढून टाकण्यात आले. IIScमध्ये ख्रिस गोपालकृष्णन विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून काम करतात.
असिस्टंट म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.. रतन टाटांच्या यशाची कहाणी
IISc च्या सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी सदस्य असलेले दुर्गाप्पा यांनी आरोप केला की, त्यांना जातीवादी शिवीगाळ आणि धमक्या दिल्या आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावरकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे.
IISc फॅकल्टी किंवा ख्रिस गोपालकृष्णन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ख्रिस गोपालकृष्णन, इन्फोसिसच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत. ते 2007 ते 2014 पर्यंत या कंपनीचे उपाध्यक्ष आणि 2007 ते 2011 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक होते. ख्रिस गोपालकृष्णन यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, 2013-14 मध्ये त्यांची फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (CII) अध्यक्ष म्हणून निवड झाली. जानेवारी 2014 मध्ये, त्यांनी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सह-अध्यक्ष म्हणून काम केले.
काय आहे प्रकरण?
जानेवारी 2011 मध्ये, भारत सरकारने गोपालकृष्णन यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले. ख्रिस गोपालकृष्णन यांनी IIT मद्रासमधून भौतिकशास्त्र आणि संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. याशिवाय गोपालकृष्णन हे इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअर्सचे (INAE) फेलो आहेत.