Download App

३ लाखांची लाच घेताना रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात, घरात सापडले २.६१ कोटीचं घबाड

  • Written By: Last Updated:

लखनौ : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी केसी जोशी (KC Joshi) यांना अटक केली आहे. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, तसेच कंपनीची शासकीय नोंदणी व नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही सीबीआयने छापे टाकून २.६१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर येथील मेसर्स सुक्ती असोसिएट्सचे मालक प्रणव त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर सोमवारी आरोपी ईशान्य रेल्वे, गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य अधिकारी केसी जोशी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांनंतर जोशी यांना मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्यांनी एका कंत्राटदाराकडून 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कंत्राटदाराने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली होती.

Ira Khan Wedding: आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ? लग्नाची तारीख आली समोर 

तक्रारदाराने आरोप केला आहे की के.सी.जोशी यांनी त्याच्याकडे सात लाख रुपयांची लाच मागितली आणि पैसे न दिल्यास सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलवरील नोंदणी तसेच नुकतेच मिळालेले करार रद्द करण्याची धमकी दिली होती. केसी जोशी हे 1988 च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS) अधिकारी आहेत.

कर्नाटकमध्ये 195 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार; महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या निर्णायकडे राज्याचे लक्ष

एफआयआरनुसार, जोशी यांनी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलला त्रिपाठी यांच्या फर्मची नोंदणी रद्द करण्यापासून रोखण्यासाठी 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्रिपाठी यांना जानेवारीमध्ये जीईएम पोर्टलद्वारे एनईआरला तीन ट्रकच्या पुरवण्यासाठी निविदा प्राप्त झाली होती. मात्र, लाच न दिल्यास फर्मची नोंदणी रद्द करण्याची धमकी जोशी यांनी दिली होती. यानंतर त्रिपाठी यांनी जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि सीबीआयने सापळा रचून कारवाई केली. त्यांच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकून २.६१ कोटी रुपये जप्त केले.

सीबीआयने जोशी यांचा संगणक आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे. एक टीम अजूनही गोरखपूरमध्ये तळ ठोकून आहे. बुधवारी सीबीआयने केसी जोशी यांना लखनौला आणले. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सीबीआय जोशीची कोठडी मागण्याची तयारी करत आहे. जोशी यांनी सीबीआयच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Tags

follow us