Mamata Banerjee : बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारतात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सर्वसामान्यांसोबतच अनेक नेत्यांनीही तेथील हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी (11 डिसेंबर) केंद्र सरकारकडे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची मागणी केली.
‘संविधाना’ची विटंबना दुर्देवी, निषेधार्ह पण कायदा सुव्यवस्था राखा; गिरीश महाजनांचं आवाहन…
बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना भारतात आणावे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
जगन्नाथ मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसीय दिघा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, केंद्राने हिंसाग्रस्त बांगलादेशातील अल्पसंख्याकांना सुरक्षितता द्यायला हवी तसेच जे परत येऊ इच्छितात त्यांना परत आणले पाहिजे. आम्हाला बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा हवी आहे, केंद्राने यासंदर्भात कारवाई करावी.
अदिती सैगलच नविन गाणं ‘10kmh’ आणि 2024 चं ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द ईयर ‘ब्रेन रॉट’ यांचा खास कनेक्शन!
हल्ले सहन करणार नाही…
बांगलादेशात भारतीयांवर होणारे हल्ले आम्ही सहन करणार नाही. हिंसाचाराची झळ सोसणाऱ्या भारतीयांची सुटका करून भारतात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. याच बरोबर ममता बॅनर्जींनी काही लोक जाणूनबुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बनावट व्हिडिओंमुळे समाजात जातीय तेढ वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल, असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं.
हिंदूंवर होतायत हल्ले –
बांगलादेशच्या 17 कोटी लोकसंख्येपैकी 8 टक्के अल्पसंख्याक हिंदू आहेत. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचे अवामी लीगचे सरकार पडल्यानंतर हिंदू धर्माला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत अनेक मंदिरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले झाले आहेत. या मुद्द्यावर केंद्र सरकारने कठोर पावले उचलून बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असं आवाहन ममता बॅनर्जींनी केलं.