Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, आता चांद्रयान-3 चा प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर चालतानाचा एक व्हिडिओ जारी केला आहे.
इस्रोने हा व्हिडिओ लँडरवर बसवण्यात आलेल्या इमेजर कॅमेऱ्याने घेतला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना स्पेस एजन्सीने ट्विट केले चांद्रयान -3 च्या रोव्हरने लँडर सोडले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर अशा प्रकारे चालले. इस्रोने सांगितले की दोन विभागातील रॅम्पमुळे रोव्हर रोल-डाउन करणे सुलभ झाले. सोलर पॅनलने रोव्हरला वीज निर्माण करण्यास सक्षम केले.
इस्रोकडून नवीन व्हिडिओ जारी
या मिशनमध्ये यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC)/ISRO बेंगळुरू येथे एकूण 26 तैनाती यंत्रणा विकसित करण्यात आल्या. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सॉफ्ट-लँड केल्यानंतर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेरा (OHRC) ने घेतलेली प्रतिमा देखील इस्रोने जारी केली.
… … and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023
इस्रोने याबद्दल लिहिले, चांद्रयान-2 ऑर्बिटरने चांद्रयान-3 लँडरचे फोटो घेतले.
सध्या रोव्हरही चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे फिरत आहे. इथून पुढे या या मोहिमेतील निरक्षण आणि संशोधनसााठी महत्वाचा डेटा इस्त्रोला मिळणार आहे.
लँडिंगचा व्हिडिओही शेअर केला
याआधी गुरुवारी इस्रोने लँडिंगच्या वेळेचा व्हिडिओही जारी केला होता. लँडर इमेजर कॅमेर्याने चंद्राची ही छायाचित्रे टचडाउनच्या आधी घेतल्याचे इस्रोने सांगितले होते. या व्हिडिओमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर खोल खड्डे दिसत होते.
https://twitter.com/chandrayaan_3/status/1694720395839160444?s=20
काही तासांनी रोव्हर बाहेर आला
भारताच्या चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलने बुधवारी (२३ ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून अवकाशात इतिहास रचला. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर काही तासांनी रोव्हर लँडरमधून बाहेर पडला.
https://twitter.com/chandrayaan_3/status/1694917573744214340?s=20
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यापूर्वी कोणीही पोहोचले नव्हते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरला.