Download App

रॉकेटपासून ते चंद्रयान-3 पर्यंत का होत आहे तामिळनाडू कनेक्शनची चर्चा; जाणून घ्या

चंद्रयान-3 मिशनचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 ची श्रीहरीकोटा येथून लाँचिंग होणार आहे. पण या पार्श्वभूमीवर चंद्रयान मिशनच्या तामिळनाडू कनेक्शनविषयी चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. तामिळनाडू येथे जन्मलेले मयिलसामी अन्नादुराई व एम. वनिता यांनी अनुक्रमे चंद्रयान-1 व चंद्रयान-2 चे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता विल्लपुरमचे पी. वीरमुथुवेल चंद्रयान-3 मिशनची जबाबदारी पार पाडत आहे.

चंद्रयान-1 च्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता. यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध लावला होता. या शोधासाठी अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने भारताची पाठ थोपटली होती. यानंतर ‘चंद्रयान-2 मिशन अयशस्वी झाले होते. आत चंद्रयान-3 प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने ही कामगिरी केलेली नाही.

वळसेंना मतदारसंघात जाऊन उत्तर देणार; आमदार रोहित पवार आक्रमक

वीरमुथुवेल हे 46 वर्षांचे असून ते चंद्रयान-3 मिशनचे नेतृत्व करत आहे. वीरमुथुवेल हे तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांनी प्रतिष्ठित भारतीय प्रौद्योगीक संस्थान ( मद्रास ) येथून शिक्षण घेतले असून पीएचडी देखील केली आहे. चंद्रयान मिशन तीनसाठी वीरमुथुवेल यांनी वनिता यांचे स्थान घेतले आहे. वनिता आधीचे इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या नेतृत्वात केलेल्या चंद्रयान -2 मिशनचे नेतृत्व केले होते. एक महिला म्हणून या पदावर काम करणाऱ्या वनिता या पहिल्या होत्या.

‘तुमच्या फालतु कुटनितीमुळे लोक तुम्हाला कुटून खातील’; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

तसेच पहिल्या चंद्रयान मोहिमेचे नेतृत्व केल्यानंतर मयिलसामी अन्नादुराई यांना मून मॅन ऑफ इंडिया ही पदवी देण्यात आली होती. ते सुद्ध तामिळनाडू येथील होते. यासह भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे देखील तामिळनाडूचे होते. त्यांनी भारताच्या रॉकेट मोहिमेचे नेतृत्व केले होते. ते तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील होते.

Tags

follow us