Chattisgarth Election Result : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनूसार छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result) भाजपने 53 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 36 जागांवरच आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इतर उमेदवाराची एका जागेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं बोललं जात आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकाल: कोण मारणार चौकार, कोण होणार बोल्ड?
छत्तीसगडमध्ये 2018 साली काँग्रेसने सत्ता खेचून आणली होती. भाजपचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांनी (2003 -2018) या काळात सत्ता गाजवली, मात्र, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत विजयाचा झेंडा फडकावला होता. त्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री भुपेंद्र बघेल मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या निवडणुकीत मात्र, भाजपने काँग्रेसला चांगलीच चुरस झाली. अखेर भाजपने सर्वाधिका जागांवर आघाडी देत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसला अपक्षांची गरज नाही, कमलनाथ यांनी सांगितला प्लान
छत्तीसगडमध्ये एकूण 90 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडलं. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात एकूण 1 कोटी 55 लाख 61 हजार 460 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला होता. छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच 75.8 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे पुरुष मतदारांपैकी महिला मतदारांचा अधिक कल यंदाच्या मतदानात दिसून आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच निवडणूक निकालांचे एक्झिट पोल समोर आले होते. इंडिया टुडे आणि माय इंडिया संस्थांच्या पोलनूसार काँग्रेसला 40-50 जागा तर भाजपला 36-40 जागा मिळणार असल्याचं दिसून आलं होतं. एक्झिट पोलनूसार भाजप-काँग्रेसमध्ये चुरस असल्याचं सांगण्यात येत होतं. वृत्तसंस्थांच्या आकडेवारीनूसार एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरल्याचं आजच्या निकालावरुन दिसून येत आहे.