Download App

अमित शाह ठरले फेल, छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसचीच मुसंडी? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

  • Written By: Last Updated:

Chattisgarh Exit Poll : नुकत्याच छत्तीसगडसह तेलंगणा, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 20 जागांसाठी मतदान झाले होते. तर उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. दरम्यान्, 3 डिसेंबरला या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र या निकालापूर्वी विविध सर्वेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे.

Government Schemes : दिव्यांग वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार? 

छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताचा आकडा पार करेल, असे चित्र आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या राज्यात काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील. भाजपला 36 ते 46 जागा मिळतील. तसेच इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळतील असे हे एक्झिट पोल सांगत आहेत.

एबीपी व्होटरनुसार-
कॉंग्रेसला 41-33
भाजपला 35-46
अन्य पक्ष- 0-4

आज तक एक्सिस नुसार-
कॉंग्रेस- 40-50
भाजप- 36-46
अन्य – 1-5

पोलस्ट्रॅट एक्सिट पोलनुसार-
कॉंग्रेस – 40 ते 45
भाजप – 30 ते 35,
इतर – 0 ते 3

Exit Poll 2023 MP : मध्यप्रदेशात कॉंग्रेसची बाजी? ‘इतक्या’ जागा जिंकणार; समोर आली आकडेवारी… 

2018 च्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल काय होते?

2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला होता. आणि निकाल जाहीर झाल्यावर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. 2018 मध्ये मतदानापूर्वी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये निकराची लढत दिसून आली आहे.

2018 मध्ये काँग्रेसने 68 जागा जिंकल्या

छत्तीसगडमध्ये 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 68 विधानसभा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत भाजपला 15 जागांवर समाधान मानावे लागले होते, तर जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) ला 5 आमदारांवर तर बसपाला 2 आमदारांवर समाधान मानावे लागले होते.

छत्तीसगड विधानसभेत पक्षीय बलाबल-
विधानसभेच्या एकूण जागा: 90
सध्याची पक्षीय ताकद: काँग्रेस (71), भाजप (15), बसपा (2), भाजप (1), जनता काँग्रेस छत्तीसगड (1), रिक्त (1)

मुख्यमंत्री – भूपेश बघेल

कोणत्या मुद्द्यांवरून प्रचार गाजला-

गौतम अदानी यांच्या खाण व्यवसायाशी संबंधित वादग्रस्त मुद्दे

लोकसंख्येच्या 30 टक्के असलेल्या आदिवासींचे हक्क

धर्मांतराचा वादग्रस्त मुद्दा

सत्ताधारी काँग्रेस आपल्या प्रचारात माओवाद्यांचा वापर करत असल्याचा BJP चा आरोप

Tags

follow us