Download App

विधानसभा अध्यक्ष आले धावून; हिमाचलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ फेल : सुख्खू सरकार थोडक्यात वाचले

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सुरु असलेल्या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याला 24 तासांनंतर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू (Sukhwinder Singh Sukhkhu) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प संमत करुन घेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे पुढील किमान तीन महिने तरी सुख्खू सरकारविरोधातील संकट टळले आहे. सरकार तरल्यानंतर आता सहा बंडखोर आमदारांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या आमदारांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर सध्या विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुनावणी सुरु आहे. (Chief Minister Sukhwinder Singh Sukhkhu has proved his majority by passing the budget in the Legislative Assembly.)

विधानसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पथानिया यांचा भाजपच्या 15 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सुख्खू यांच्या पथ्य्यावर पडल्याचे दिसून आले. या आमदारांच्या निलंबनानंतर 68 सदस्यीय विधानसभेतील बहुमताचा आकडा 27 पर्यंत खाली आला होता. त्यावेळी सभागृहातील उर्वरित भाजपचे 10, काँग्रेसचे सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर 34 आमदारांच्या साथीने काँग्रेसने अर्थसंकल्प संमत करुन घेतला. तर काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांना पुन्हा हरियाणामधील पंचकुला येथे पाठविण्यात आले आहे.

Letsupp Exclusive : संभाजीराजेंचा पत्ता कट; कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार

हिमाचल प्रदेशमध्ये हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा :

राज्यसभेच्या एका जागेवरील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुख्खू यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र अवघ्या काही वेळात त्यांनी युटर्न घेत आपण राजीनामा देणार नसून ‘लढणार’ असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा गाठत अर्थसंकल्पच मंजूर करवून घेतला आणि बहुमतही सिद्ध केले.

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांमध्ये काय घडले?

68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये 34 हा बहुमताचा आकडा आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 जागा जिंकत दणदणीत बहुमत मिळविले होते. तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर तीन अपक्ष आमदारांनी देखील काँग्रेससोबतच जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसचे सरकार स्थिर मानले जात होते.

मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरना म्हणून चौकशी सुरू; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

मात्र काल राज्यसभेच्या एका जागेसाठी राज्यात मतदान पार पडले. यात पूर्ण बहुमत असूनही काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला, तर भाजपच्या हर्ष महाजन यांच विजय झाला होता. मतदानावेळी सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इंद्रदत्त लखनपाल, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आणि अपक्ष तीन आमदारांनी भाजपला मतदान केल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सहा बंडखोर आमदारांना हरियाणातील पंचकुला येथे नेण्यात आले होते.

आज सकाळी शिमलामध्ये परतल्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांनी आपण भाजपसोबत जाणार असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर भाजपने विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 15 आमदारांचे निलंबन केले. त्याचवेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचे चिरंजीव आणि सुख्खू सरकारमधील मंत्री विक्रमादित्य यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत सुख्खू यांच्यावर गंभीर आरोप केले. विक्रमादित्य यांच्या राजीनाम्यानंतर सुख्खू यांनीही आपला राजीनामा पर्यवेक्षकांकडे दिला. मात्र काही वेळात त्यांनी युटर्न घेत आपण लढणार असल्याचे जाहीर केले.

follow us