युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनची मोठी तयारी; ईस्ट चायना समुद्रात 400 किमीपर्यंत 2000 जहाजे तैनात

जहाजांच्या माध्यमातून चीन समुद्रातील मार्ग रोखण्याचा किंवा समुद्री नाकेबंदीचा सराव करत असल्याचा दावा केला जात आहे.

Untitled Design 15

Untitled Design 15

China’s major preparations in the wake of war : एकीकडे अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाला आज चौदा दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्व भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून त्याचे पडसाद जगभर उमटू लागले आहेत. परिस्थिती अशीच काही दिवस कायम राहिली, तर जागतिक स्तरावर मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भेटी व्यक्त केली जात आहे.

मध्यपूर्वेतील या तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होत असून अनेक देशांमध्ये इंधनाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे. अशा तणावपूर्ण परीस्थितीत आता चीनच्या हालचालींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आशिया खंडात संघर्षाची तयारी सुरू असल्याचे संकेत देणारे एक महत्वाचे सॅटेलाईट चित्र समोर आले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

हे सॅटेलाईट चित्र नासाच्या माहितीनुसार वृत्तसंस्था एएफपीने प्रसिद्ध केले आहे. या चित्रात ईस्ट चायना समुद्र परिसरात चीनची तब्बल दोन हजार मासेमारी करणारी जहाजे एकाच वेळी तैनात असल्याचे दिसून येते. या जहाजांच्या माध्यमातून चीन समुद्रातील मार्ग रोखण्याचा किंवा समुद्री नाकेबंदीचा सराव करत असल्याचा दावा केला जात आहे.

 

विशेष म्हणजे ही जहाजे सुमारे 400 किलोमीटरच्या परिसरात अशा पद्धतीने मंडळी गेली आहेत की युद्धाच्या वेळी कोणत्याही दिशेने येणाऱ्या शत्रूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, संभाव्य संघर्षाच्या वेळी जपान, फिलिपाइन्स आणि तैवान या देशांच्या समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवण्याचा सराव असू शकतो. त्यामुळे भाविषयात या देशांपैकी कोणत्याही देशासोबत चीनचा तणाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, चीनने युद्धसदृश तयारीसाठी मासेमारी करणाऱ्या जहाजांचाच वापर का केला, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, यामागे चीनची स्पष्ट रणनीती आहे. मोठ्या प्रमाणावर मासेमारीची जहाजे वापरल्यास समुद्रातील वाहतूक थांबवणे सोपे होते. आणि युद्धकाळात शत्रू राष्ट्रांच्या मार्गावर अडथळा निर्माण करणे देखील शक्य होते. त्याचबरोबर अशा प्रकारे हजारो जहाजांची तैनाती करून चीन जगाला आपल्या लष्करी आणि सामरिक तयारीचा इशारा देखील देत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या जागतिक परिस्थितीत या घडामोडींनी आणखी चिंता वाढवली आहे.

Exit mobile version