CJI Surya Kant: एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत (Surya Kant) यांनी एक निरीक्षण नोंदविताना देशातील तरुण बेरोजगारांना झुरळांसारखे म्हणत, पुढे हे तरुण माध्यमे, आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात, असे टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली होती. त्यावर देशभरातून सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले. त्या विधानाबाबत सरन्यायाधीशांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझे विधान देशातील तरुणांना उद्देशून नव्हते. तर बनावट पदव्या घेऊन व्यवसायात प्रवेश करणाऱ्यांना उद्देशून होते. मला भारतातील तरुणांवर गर्व आहे. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय, असे स्पष्टीकरण सरन्यायाधीशांनी दिलंय.
मोबाईल काढला, स्कॅन केलं अन् पैसे ट्रान्सफर; जाणून घ्या, UPI नक्की कसं काम करतं?
माध्यमांच्या एका गटाने माझ्या तोंडी वक्तव्याचा विपर्यास केल्याबद्दल मला खेद आहे. मी विशेषतः अशा लोकांवर टीका केली होती, जे बनावट पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात किंवा कायद्याच्या क्षेत्रात आले आहेत. असे लोक परजीवींप्रमाणे माध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही घुसले आहेत. मी देशातील तरुणांवर टीका केली, असे म्हणणे पूर्णपणे खोटे असल्याचे सरन्यायाधीश यांनी म्हटलंय.
जरांगे पाटलांची आंदोलनाची घोषणा होताच सदावर्ते मैदानात, एकनाथ शिंदेंचं नाव घेत केला ‘हा’ आरोप
देशातील तरुण मला प्रेरणा देतो-सरन्यायाधीश
मला केवळ देशाच्या सध्याच्या आणि भविष्यातील मानवी संसाधनांच्या क्षमतेचा अभिमान नाही, तर भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो. मी भारतीय तरुणांचा आदर करतो आणि त्यांना विकसित भारताचे आधारस्तंभ मानतो, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
वाद का निर्माण झाला होता ?
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर एक याचिका होती. एका वकिलाला ज्येष्ठ वकील दर्जा देण्यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना झुरळ असे संबोधले होते. झुरळांसारखे काही तरुण आहेत. ज्यांना कोणतीही नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात कोणतेही स्थान नाही. त्यापैकी काही मीडिया बनतात, काही सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्ते बनतात आणि ते सर्वांवर हल्ला करू लागतात, असे सरन्यायाधीश म्हणाले होते.
