Cockroach Janata Party : नीट पेपर फुटी विरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता केंद्र सरकारकडून देखील अनेक घडामोडींना वेग आलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील पेपर फुटी प्रकरणात कठोर कायदा आणणार असल्याची माहिती दिली आहे. तर केंद्र सरकारने तीन अटी मान्य केल्याने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक यांनी राजीनामा दिल्यानंतर देखील आंदोलन सुरु असणार असल्याची माहिती कॉक्रोज जनता पार्टीकडून देण्यात आली आहे. जेव्हापर्यंत धर्मेंद प्रधान राजीनामा देणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली आहे. तर दुसरीकडे कॉक्रोज जनता पार्टीचा सरकारव दबाव असल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका केला आहे.
माध्यमांशी बोलताना कॉक्रोज जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका (Ashutosh Ranka) म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतरमंतर येथील आंदोलन सुरूच राहील. पंतप्रधान मोदींना (PM Modi) मध्यरात्री 12.30 वाजता व्हिडिओ मेसेज जारी करावा लागला, यावरूनच हा दबाव किती प्रचंड आहे हे दिसून येते असं आशुतोष रांका म्हणाले. तसेच मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. पेपरफुटीच्या मुद्द्याबाबत मंत्रिमंडळ काय निर्णय घेते किंवा घेत नाही, यात पक्षाला रस नाही. जेव्हापर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरु राहणार असं देखील माध्यमांशी बोलताना आशुतोष रांका म्हणाले.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला कल्पना आहे की पेपर फुटीची (NEET Exam) घटना ही काही किरकोळ बाब नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणूनच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोषींना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हे सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी होती त्यामुळे परीक्षा लवकरात लवकर घेणे अत्यंत आवश्यक होते. कमीत कमी वेळेत हे सर्व व्यवस्थापित करण्यासाठी सरकारने आपली सर्व संसाधने पणाला लावली आणि अवघ्या पाच-सहा दिवसांपूर्वी, म्हणजेच 19 तारखेला निकाल जाहीर करण्यात आले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार
देशभरातील विद्यार्थ्यांच्या यशाची बातमी आनंद देणारी असली, तरी आम्ही केवळ त्यावरच समाधान मानून थांबणारे नाही आहोत. म्हणूनच, ‘फास्ट-ट्रॅक कोर्ट’ स्थापन करण्याच्या दिशेने काम करण्याच्या सूचना मी आज संबंधित विभागांना दिल्या. संबंधित विभागांनी आज उशिरा मला यासंदर्भातील मसुदा सादर केला. फास्ट-ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेला हा मसुदा उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवला जाईल.
धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? उपोषणानंतर सोनम वांगचुक स्पष्टच म्हणाले
मंत्रिमंडळाच्या सूचनांनुसार अंतिम स्वरूप दिल्यानंतर, आम्ही हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू ज्याची सुरुवात सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाईल असं प्रतप्रधान मोदी म्हणाले.
