विषारी कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीवर मोठी कारवाई, कंपनी मालक रंगनाथनला अटक

Coldrif Cough Syrup : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत

Coldrif Cough Syrup

Coldrif Cough Syrup

Coldrif Cough Syrup : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तामिळनाडूमधील कोल्ड्रिफ कंपनीचे मालक एस. रंगनाथन यांना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी औषध लिहून देणारे डॉक्टर प्रवीण सोनी यांना देखील अटक करण्यात आली होती. छिंदवाडा, बैतुल आणि इतर भागात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 20 मुलांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंनंतर मध्य प्रदेश सरकारने सिरपवर बंदी घातली आहे. पंजाब आणि राजस्थानमध्येही या सिरपवर बंदी घालण्यात घालण्यात आली आहे.

या प्रकरणात माहिती देताना छिंदवाडा पोलिस अधीक्षक अजय पांडे यांनी सांगितले की, श्रीसन फार्माचे (Srisan Pharma) मालक एस. रंगनाथन (S. Ranganathan) यांना 08 ऑक्टोबरच्या रात्री अटक करण्यात आली. रंगनाथन यांना चेन्नई (तामिळनाडू) येथील न्यायालयात हजर केले जाईल आणि ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर त्यांना छिंदवाडा येथे आणले जाईल. 8 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश पोलिसांचे एक विशेष पथक तामिळनाडूत बंदी घातलेल्या कफ सिरपची निर्मिती (Coldrif Cough Syrup Case) करणाऱ्या कंपनीच्या मालक कोल्ड्रिफविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोहोचले होते.

या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी जबलपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एसपी) अंजना तिवारी यांच्या नेतृत्वाखाली  एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. परसिया उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) जितेंद्र जाट यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलिस पथके 08 ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि कांचीपुरम, तामिळनाडू येथे पोहोचली.

Asaduddin Owaisi : नगर शहरात आज खासदार ओवैसींची जाहीर सभा, टार्गेट कोण?

तर दुसरीकडे छिंदवाडा, पंढुर्णा आणि बैतुलमध्ये एकूण 20 मुलांनी आपला जीव गमावला आहे. सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करत आहे. गेल्या 24 तासांत तीन मुलांनी आपला जीव गमावला आहे. मध्य प्रदेशसह नागपूरमध्ये अजूनही पाच मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त असल्याची माहिती मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी दिली.

Exit mobile version