नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच रविवार 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होतील. मात्र, याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सर्वच पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दरम्यान, निवडणूक निकालांपूर्वीच, काँग्रेस (Congress) अलर्ट मोडमध्ये आली आहे. पक्षाचे ‘संकटमोचक ‘ म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनाही आता पक्षाने सक्रीय केलं. घोडेबाजार रोखण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे.
Animal च्या लाटेवर भाजप स्वार; ‘या’ गाण्यावर बनवला मोदींचा खास व्हिडीओ…
परवा समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजप, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये निकराची लढत दिसून येत आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेसला थोडीशी आघाडी मिळण्याची अपेक्षा आहे. तर जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये तेलंगणामध्ये सुमारे 10 वर्षानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यातही सत्ताधारी बीआरएस आणि विरोधी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत असल्याचे दिसत आहे.
शिवकुमार यांच्यावर मोठी जबाबदारी
दरम्यान, एका वृत्तपत्राने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस हायकमांडने पक्षाचे संकटमोचक आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना सक्रिय केले आहे. छत्तीसगड आणि तेलंगणात या दोन राज्यांमध्ये प्रतिस्पर्धी पक्ष भाजप आणि बीआरएस यांच्याकडून होणार्या कोणत्याही संभाव्य घोडेबाजाराचा प्रयत्न रोखण्यासाठी काँग्रेसने डीके शिवकुमार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस हायकमांडने शिवकुमार यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात पाठवले आहे. शिवकुमार यांना सर्व नेत्यांना एकत्र ठेवण्यास सांगितले आहे.
आव्हाड आणि परांजपे यांना शरद पवारांनी राजीनाम्यानंतर काय सांगितलं?
वृत्तपत्राने कर्नाटक काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शिवकुमार आणि पक्षाच्या राज्य युनिटला काँग्रेस आमदारांना राहण्यासाठी किमान २ ते ३ रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्स तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच त्यांना काही अतिरिक्त हॉटेल्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जेणेकरून गरज भासल्यास मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील आमदारांनाही तेथे राहता येईल.
वृत्तपत्राने काँग्रेसच्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हवाल्याने म्हटले आहे की, तेलंगणात काँग्रेसने 119 पैकी 70 जागा जिंकल्या तर आमदारांच्या बॅरिकेडिंगची गरज भासणार नाही. पण आमची संख्या 70 च्या खाली गेली तर आमदारांना बेंगळुरूला आणले जाईल.’ तर राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळते, अशा परिस्थितीत तेथील आमदारांनाही बेंगळुरूला आणावे लागेल.
मात्र, डीके शिवकुमार यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, हायकमांड आणि पक्ष जे काही आदेश देतील, ते त्याचे पालन करतील. तथापि, एक्झिट पोलच्या अंदाजात तथ्य आहे यावर माझा विश्वास नाही. पाच राज्यांत काँग्रेस आघाडीवर आहे. गरज पडल्यास पक्षाच्या सूचनेनुसार काम करावे लागेल. आमचे राष्ट्रीय आणि राज्याचे नेत्यांना पूर्ण विश्वास आहे की, काँग्रेसचा एकही आमदार विकत घेता येणार नाही. यासोबतच ते म्हणाले की, रिसॉर्टच्या राजकारणाबाबत लोकांना योग्य माहिती नाही.